II आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन II-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 08, 2021, 12:23:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन II
                              -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-०८.०९.२०२१ आहे. आजच्या दिनाचे वैशिष्टय म्हणजे आज "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन " आहे. जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व आणि इतर माहिती.


                                 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
                                       लेख क्रमांक-१
                                -------------------------


     September 08-International Day of Literacy To highlight the importance of literacy to individuals, communities and societies.

     साक्षरतेचे महत्त्व कोणाला माहीत नाही? पण केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे.
      - जोसेफ तुस्कानो

     साक्षरतेचे महत्त्व कोणाला माहीत नाही? पण केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.

     राष्ट्रकुलाच्या 'युनेस्को' (शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक) या संघटनेने १९६५ साली जागतिक पातळीवर साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा केली व त्याच्या पुढच्या वर्षापासून ८ सप्टेंबरला जगभर ती प्रथा रुढ झाली. शिक्षणाचे महत्त्व सकलजनांना पटवून देण्यासाठी या दिवशी विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जातात. गरिबीचे उच्चाटन, बालमृत्यू, लोकसंख्या वाढ, स्त्रीपुरुष समानता, शांती आणि प्रजासत्ताक धोरण या समाज उन्नतीशी निगडीत बाबींच्या मुळाशी शिक्षण आहे व त्याचा प्रसार झाला तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.

     युनेस्कोच्या व्याख्येनुसार साक्षरता म्हणजे माणसाला दैनिक जीवनाशी निगडित बाबीविषयी लिहिता वाचता येणे, मानवी जीवनातील घडामोडींचे विश्लेषण करता येणे व वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून स्वत:च्या व समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे.

     दुदेर्वाची बाब अशी आहे की, जगभरात ७७ कोटींहून जास्त लोक शिक्षणाला वंचित झालेले आहेत. पाचपैकी एक प्रौढ निरक्षर आहे. त्यातील दोन तृतीयांश महिला आहेत. ७ कोटींपेक्षा जास्त मुले शिक्षणाला वंचित झालेली आहेत त्यातील बरीच मुले नियमित शाळेत जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना शाळा अर्धवट सोडावी लागते. जगातील ३५ देशांत तर साक्षरतेचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात पुन्हा स्त्रियांचा वाटा दोन तृतीयांश आहे.

     इ.स. २००० पासून राष्ट्रकुलाने चार कलमी कार्यक्रम हाती घेऊन निरक्षरतेवर मात करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत:

* सकलांना शिक्षण
* सहस्त्रकाच्या प्रगतीचे एक उद्दिष्ट
* राष्ट्रकुलाचे साक्षरता दशक
* राष्ट्रकुलाचे शिक्षण व प्रगतीचे एक सातत्य राखण्याचे दशक

     या कार्यक्रमांतर्गत विविध देशाची सरकारे साक्षरता प्रसारासाठी कटीबद्ध झालेली आहेत.

     आपल्याकडे केरळ राज्य सोडले तर अन्य ठिकाणी साक्षरतेबाबत आनंदच आहे. आपला देश साक्षर व्हावा असे वाटत असेल, तर प्रत्येक सुशिक्षित नागरिकाला या यज्ञकुंडात योगदान द्यावे लागेल. आपल्या अशिक्षित देशबांधवांना साक्षर करण्यासाठी सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी स्तरावर जे प्रयत्न चालू आहेत, त्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य ठरते.


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                   -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.09.2021-बुधवार.