II गणपती बाप्पा मोरया II - लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 10, 2021, 02:04:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गणपती बाप्पा मोरया II
                                           लेख क्रमांक-१
                                  --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार म्हणजे आजपासून  पासून यंदाची गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 

                        गणेशोत्सवाचा ज्ञात इतिहास-----

     लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी सुरू झाल्यावर एका कार्यक्रमात लोकमान्यांनी 'हा गणेशोत्सव एक दिवस ऑलिंपिकच्या बरोबरीने जगभर साजरा होईल असे बोलून दाखविले होते. त्याचे त्यांनी असे कारण दिले होते की, आलिंपिक हाही एका देवतेचा उत्सव आहे. जगातील तरुण क्रिडापटू त्यांच्या तपश्चर्येचे आणि कौशल्याचे कसब दाखवून त्या रोममधील देवतेची आराधना करतात, त्याच प्रमाणे गणेश ही विद्यादेवता येणार्‍या काळात सार्‍या जगाची प्रेरणा देवता होईल.जगभर ज्या प्रमाणात हा उत्सव पसरत आहे ते पाहिले तर तोही दिवस दूर नाही, असे आज म्हणता येईल

     गणेशपूजा आणि गणेशोत्सव पूजा यात महत्वाचा फरक असा की, गणेशोत्सव पूजा ही व्यक्तिगत असू शकते पण गणेशोत्सव ही प्रकि'या सार्वजनिक असते. गेल्या सव्वाशे वर्षात गणेशपूजेला सार्वजनिक गणेशोत्सव पूजेचे रुप आले. व्यक्तिगत पातळीवर गणेशपूजा शरीराच्या मूलाधारचक्रावर आधारित असते तर सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेशपूजा समाजाच्या मूलाधारावर उभी असते. विसाव्या शतकात स्वातंत्र्योत्तर काळात गणेशोत्सवात काही रोंबासोंबा प्रकार आले असे मानले तरी मूळ सार्वजनिक गणेशोत्सवाने स्वातंत्र्य चळवळीला एक निष्ठेचा मूलाधार मिळाला.

     जगात सध्यातरी असे एकही शहर नाही, की तेथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत नाही. ही सारी वाढ प्रामु'याने गेल्या पंचवीस वर्षातील आहे. सर्वसाधारणपणे आजपर्यंत असा अनुभव आहे की, कोठेही प्रथम महाराष्ट्रीय कुटुंबात प्रथम गणेशोत्सव सुरु होतो नंतर त्या त्या भागात प्रत्येक भारतीय मंडळांत हा उत्सव सुरु राहतो. देशाच्या फार मोठया भागात गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा होतो, त्यात महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र, आणि तामीळनाडू या राज्यांचा समावेश आहे. हा गणेशोत्सव सुरू होण्यास लोकमान्यांची प्रेरणा कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे.

     शिवाजी महाराजांनी बालवयातच 1636 साली पुण्यात पहिला गणेशोत्सव सुरू केला त्याची वाढ 'प्रतिपश्चन्द्ररेखेव 'सतत वाढतच राहिली. पण गणेशोत्सवाचा एवढा विस्तार होण्यात लोकमान्य टिळक वा छत्रपति शिवाजी महाराज यांची जेवढी निर्णायक भूमिका आहे, तेवढीच निर्णायक भूमिका विजापूरचा इ.स. 1579 ते 1627 दरम्यान गादीवर असलेला इब्राहीम दुसरा आदिलशहा याची आहे. वास्तविक विजापूरची आदिलशाही ही दीर्घकाळ मूर्तिभंजनासाठी प्रसिद्ध आहे. तरी दुसरा इब्राहीम आदिलशहा यांची गणेशोत्सवाच्या वाढीतील सिंहाचा वाटा दुलर्र्क्षण्यासारखा नाही कारण तो देवी सरस्वती आणि ओंकारमूलक गणपती या विद्येच्या दैवतांना आपले आई वडील मानत असे.

     अठठेचाळीस वर्षे आदिलशाहीवर असलेल्या दुसर्‍या इब्राहिमने स्वत:च्या प्रत्येक पत्राची सुरवात सरस्वती आणि गणपती यांच्या वंदनाने केली आहे. अनेक मुसलमान सरदार हे भारतीय दैवतांचे उल्लेख आपल्या कागदपत्रात पूज्य भावनेने करत असत. असे करणे येथे लोकप्रीय होण्यास उपयोगी ठरणारे वाटल्याचेही कारण असेल. कारण कसबा गणपतील 120 एकर जमीन देणारा इब्राहीम बादशहा आणि त्याचा पुढील पिढीतील बादशहाने मात्र ते मंदीर तर उजाड केलेच पण त्यावेळच्या गणेश चौकात गाढवाचा नांगर फिरवला. त्या मंदिराची पुनर्स्थापना जिजामातांच्या प्रेरणेने झाली. शिवकालातील परंपरेतून लोकमान्याच्या काळात गेलेला गणेशोत्सव हे दोन्ही पुण्यातील असले तरी तो प्रवास मात्र दूरवरचा आहे. लालमहालातून किंवा शनिवार वाडयातून हा गणेशोत्सव दगडू हलवाई मंडळ किंवा लोकमान्यांच्या गायकवाडवाडा येथे तो ग्वाल्हेरमार्गे आला आहे. लाल महालापासून गायकवाड वाडा किंवा दगडू हलवाई गणपती ही जागा एक किलोमीटरच्या आत आहे. तरी प्रवास 100 वर्षाचा आणि अडीच हजार किलोमीटरचा आहे.

     त्या कसबा गणपतीला पूजेसाठी एकशेवीस एकर जमीन दिल्याचे बादशाही फर्मान आज उपलब्ध आहे. हे फर्मान कोणा सरदाराची देणगी नाही ते शाही फर्मान आहे. नंतर या द'खन च्या पठाराच्या विकासात महतवाची भूमिका बजावणार्‍या मलिकअंबरनेही कसबा गणपती त्यावेळच्या भाषेत (मोरेस्वर देव) या दैवताची उपासना करण्यासाठी विशेष काळजी घेतली होती. शहाजी महराजांनीही त्यांच्या परगण्यातील दैवत म्हणून त्याची काळजी घेतली होती. इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांनी या संदर्भात अनेक पुराव पुढे मांडले आहेत. गणपतीला सार्वजक गणेशाचे जे रूप मिळाले त्याला ग्वाल्हेरचा गणपती अधिक कारणीभूत आहे. 1891 च्या सुमारास पुण्याचे वैद्य खासगीवाले ग्वाल्हेर येथे गेले असताना तेथे सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या गणेशपूजेमुळे ते प्रभावित झाले.


                          (साभार आणि सौजन्य-मोरेश्वर जोशी, पुणे)
                                     (संदर्भ-माझा पेपर.कॉम)
                        ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2021-शुक्रवार.