II गौरी-गणपती शुभेच्छा II- लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 10, 2021, 07:08:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II  गौरी-गणपती शुभेच्छा II
                                        लेख क्रमांक-१
                               ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक- १२.०९.२०२१-रविवार रोजी गौरी चे आगमन होत आहे,दिनांक-१३.०९.२०२१-सोमवार रोजी तिचे साग्रसंगीत पूजन होऊन, दिनांक-१४.०९.२०२१-मंगळवार रोजी, गणेश मूर्ती सह तिचे विसर्जन होणार आहे. मराठी कवितेच्या सर्व कवी आणि कवयित्री, बंधू-भगिनींस गौरी-गणेशाच्या हार्दिक शुभेच्छा. जाणून घेऊया, गौरी पूजन, गौरी गणपती उपवास स्वरूप ,गौरी गणपतीचा इतिहास,गौरी गणपतीचे महत्त्व,गौरी घालण्याचे वेगवेगळे मार्ग , व्रत कथा, पूजा विधी, कविता आणि बरंच काही.

     यंदा गणपती 10 सप्टेंबरला येणार आहेत तर गौरीचे आगमन 12 सप्टेंबरला होणार असून 13 तारखेला त्यांचं पूजन होणार आहे. आणि घरगुती गौरी- गणपतींचं विसर्जन 14 सप्टेंबरला होणार आहे.
   
     अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 सप्टेंबर 2021 दिवशी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबतच घरा-घरामध्येही गणपती बाप्पाचं (Ganpati Bappa) आगमन होणार आहे. यंदा देखील कोरोनाचं संकट घोंघावत असल्याने गणेश चतुर्थी सोहळा (Ganesh Chaturthi 2021) अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आलं आहे. त्यामुळे तुमच्या घरी देखील यंदा गौरी-गणपतीचं (Gauri- Ganpati) आगमन होणार असेल तर त्याच्या दर्शनाचं आमंत्रण तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना देताना सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षिततेचा विचार नक्की करा. मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील तुम्ही आप्तजनांना ऑनलाईन दर्शनाची लिंक उपलब्ध करून तुमच्या आनंदामध्ये सहभागी करून घेऊ शकता. मग समाजिक भान ठेवत यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना आणि गणेशोत्सवाचं आमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिकांचा हा काही नमूना तुम्ही वापरून नक्कीच तुमच्या गणेशोत्सव सेलिब्रेशन मध्ये सहभागी करून घेऊ शकता.

     कोरोना संकट नियंत्रणात असल्याचं वाटत असलं तरीही आगामी दिवसातील गर्दी तिसर्‍या लाटेला आमंत्रण देऊ शकते त्यामुळे घरात एका वेळी किती जणांना आमंत्रण देऊ शकता याचा विचार करून निमंत्रणं द्या. तसेच घरात दर्शनाला येणार्‍या आप्तजनांच्या सुरक्षेची काळजी घ्या. त्यांच्यासाठी सॅनिटायझरची सोय करा.

         गणेशोत्सव 2021 आमंत्रण पत्रिका नमुने-----

नमुना 1:-----
--------

गणेशोत्सव 2021 सस्नेह आमंत्रण

यंदा आमच्या घरी 10 सप्टेंबर ते 14सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे तरीही आपण सहकुटुंब सहपरिवार बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाला यावं हे आग्रहाचं आमंत्रण.

पत्ता-

लिंक -

निमंत्रक-

नमुना 2:----
--------

सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्या घरी गौरी-गणपतीचे आगमन होणार आहे. आपण बाप्पाच्या दर्शनाला येऊन आमचा आनंद द्विगुणित करावा, ही विनंती

पत्ता -

आरतीची वेळ - दुपारी 12.30, संध्याकाळी 7.30

निमंत्रक-

नमुना 3:-----
--------

गणपती बाप्पा मोरया

दरवर्षी प्रमाणे यंदाही 10 सप्टेंबर दिवशी आमच्याकडे गणरायाचं तर 12  सप्टेंबर दिवशी गौराईचं आगमन होणार आहे. तरीही आपण ऑनलाईन माध्यमातून बाप्पाचा आशिर्वाद घ्यावा ही विनंती!

वेळ-

लिंक -

गौरी पूजन तारीख- वेळ : 13 सप्टेंबर, सकाळी 10 वाजल्यापासून

दरम्यान गणपती 10 सप्टेंबरला येणार आहेत तर गौरीचे आगमन 12 सप्टेंबरला होणार असून 13 तारखेला त्यांचं पूजन होणार आहे. आणि घरगुती गौरी- गणपतींचं विसर्जन 14 सप्टेंबरला होणार आहे.


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.लेटेस्टली.कॉम)
               -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2021-शुक्रवार.