II ऋषिपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा II-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 11, 2021, 02:39:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          II ऋषिपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा II
                                      लेख क्रमांक-१
                         ---------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस ऋषिपंचमी म्हणून साजरा केला जातो. यंदा ऋषिपंचमी शनिवारी- ११ सप्टेंबर रोजी येत आहे. जाणून घेऊया, या दिवसाचे महत्त्व, माहिती, कथा, व्रत, आणि बरंच काही.

     देशभरासह महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरोघरी बाप्पाचे आगमन झाले असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होताना दिसून येत आहे. कोरोनाची परिस्थिती असली तरीही गणेशोत्सवाचा उत्साह मात्र काही कमी झालेला नाही. तर गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषि पंचमी (Rishi Panchami) साजरी करण्यात येते. तर भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषि पंचमी असे सुद्धा म्हटले जाते.

     तर नकळत झालेल्या पापांमधून मुक्तता मिळावी आणि हिंदू पुराणानुसार, सातही ऋषींच्या स्मरणार्थ, त्यांच्याप्रती असणारा आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला ऋषी पंचमीचे व्रत करतात. या व्रता दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात सात ऋषींची पूजा केली जाते. आहारात बैलांच्या मदतीने न घेतलेल्या पीकांचा, भाज्यांचा, धान्यांचा आहारात समावेश करून हे ऋषी पंचमीचे व्रत केले जाते. या दिवशी खासकरुन ऋषीची भाजी सुद्धा बनवली जाते.

     दरम्यान, ऋषी पंचमी हा गणेश चतुर्थीनंतर येणारा दुसरा दिवस असतो. या दिवशी अनेक घरांमध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक तलावं, पाणवठे, नदी किंवा आता कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन केले जाते.


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .लेटेस्टली.कॉम)
                   ------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2021-शनिवार.