II गणपती बाप्पा मोरया II - लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 11, 2021, 03:15:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गणपती बाप्पा मोरया II
                                           लेख क्रमांक-2
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची  गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 

                        गणेशोत्सवाचा ज्ञात इतिहास-----


     मोठमोठया वाडयात चौकात होणारे शास्त्रीय मनोरंजनाचे मेळे, नाटके, भाषणे, प्रवचने, हे कार्यक'म त्यांना अतिशय आवडले. हा उपक'म पुण्यात सुरु करावा आणि त्यासाठी लोकमान्यांची मान्यता मिळवावी ,असे त्यांना वाटले. एकोणिसाव्या शतकातील शेवटची 15-20 वर्षे पुण्यात ' टिळकवर्षेच ' मानली गेली होती. प्रत्येक गोष्टीवर लोकमान्य कसा विचार करतील असा विचार करण्याची तरूणांच्यात एक प्रवृत्तीच निर्माण झाली होती. वैद्य खासगीवाले यांनी गणेशोत्सवाची ही कल्पना त्यांचे समवयस्क मित्र दगडू हलवाई, भाउ रंगारी, आदि मंडळींना सांगितली. हा विषय आपण टिळक यांना सांगू अशी कल्पना पुढे आली. पण '' आधी केले मग सांगितले '' या विषयावर लोकमान्यांचे नुकतेच भाषण झाले होते.

     अर्ध्या दमडीची अफू घेतली की राष्ट्रोद्धाराच्या शेकडो कल्पना सुचतात पण त्यातील एखादी राबवणेही कठीण असते, असे निराळ्या एका प्रसंगाने त्यांनी सांगून झाले होते म्हणून या मंडळीनी 'प्रथम सार्वजनिक गणपती बसवले, कांही कार्यक्रम ठरविले आणि नंतर ते लोकमान्यांना भेटायला गेले. लोकमान्य तेंव्हा विंचूरकर वाडयात रहात असत. त्यांना सार्वजनिक गणेशोतसवाची कल्पना अतिशय आवडली विसर्जनाच्या मिरवणूकीला आपण स्वत: येउ असे त्यांनी सांगितले. आणि त्यादिवशी सध्याच्या नगरकर तालीम चौकापासून सध्याच्या विजय टॉकीज चौकापर्यंत ते त्या मिरवणुकीत होते. गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीत लोकमान्य आल्याची बातमी आजूबाजूच्ला वार्‍यासरशी पसरली आणि पुढे प्रचंड गर्दीही झाली.

     मिरवणुकीतून परत आल्यावर त्यांचे स्वीय सचीव धोडोपंत विद्वांस यांना त्यांनी डेस्कवर दौत टाक घेउन बसण्यास सांगितले. विंचुरकरवाडयाच्या पहिल्या मजल्यावरील त्या 3 0 फूट लांब दालनात येरझार्‍या घालण्यास सुरवात केली, आणि धोंडोपंथांना म्हणाले, '' घ्या ! या आठवडयाचे संपादकीय"

     त्यांच्या त्या संपादकीयाने स्वातंत्र्य चळवळीत एक अध्यायच सुरू झाला गणेश मंडळाच्या निमित्ताने लोक एकत्र येउ लागले आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीचे अनेक उपक्रम उभे राहिले.

     लोकमान्य एक शब्द बोलले आणि त्यातून एक चळवळ उभी राहिली. असे होवू शकते का, याचा अंदाज आज करता येणार नाही. पण लोकमान्यांनी एखादा शब्द बोलावा आणि त्याचा इतिहास व्हावा, असे त्या काळी अनेक बाबीत झाले होते.

     ज्या एका वाक्यामुळे ते देशाचे अनभिषित नेते झाले तेही असेच प्रभावी होते. गणेशोत्सवाप्रमाणे हाही प्रसंग तेवढाच स्पृहणीय आहे. अर्थात हा प्रसंग गणेशोत्सवाच्या प्रारंभानंतर 14 वर्षांनी घडलेला आहे. लोकमान्यांचे सामर्थ्य लक्षात यावे म्हणून त्याचा येथे उल्लेख करत आहे.

     सन 1904 मध्ये लॉर्ड कर्झनने हिंदू मुस्लिमात फूट पाडण्याच्या तत्वावर बंगालची फाळणी झाहीर केल्यावर बंगालमध्ये संतापाची लाट आली सारा बंगाल पेटला. त्या चळवळीला राष्ट्रीय रुप देण्याचेकाम लोकमान्यांच्या एका वाक्याने केले.


                           (साभार आणि सौजन्य-मोरेश्वर जोशी, पुणे)
                                     (संदर्भ-माझा पेपर.कॉम)
                       ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2021-शनिवार.