II गणपती बाप्पा मोरया II -गणेश चतुर्थी शुभेच्छा -शुभेच्छा क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 11, 2021, 03:18:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II गणपती बाप्पा मोरया II
                              गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
                                      शुभेच्छा क्रमांक-2
                           ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची  गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 

      या वर्षी गणेश चतुर्थी १०  सप्टेंबर  २०२१  या दिवशी आहे आणि आपण सर्व आपआपल्या घरात बाप्पाच्या स्वागताची जोरात तयारी करत आहोत. या खास प्रसंगी आपण घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्दशीपर्यंत पूजा-अर्चना करतो. गणेश चतुर्थी चा हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो.


                                      गणेश चतुर्थी शुभेच्छा
                                    ---------------------


गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा I

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे...
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा I

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. "
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते...
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा I

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे...
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा I

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन...
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया...

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
|| गणपती बाप्पा मोरया ||

माझे गणराज ............
येतील गणराज मुषकी बैसोनी
स्वागत करुया तयांचे हसोनी
आनंदे भरेल घर आणि सदन
घरात येता प्रसन्न गजवदन
देतील आशिर्वादा सेवून ते मोदका
कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती
करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती
भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती
सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती I


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                 ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2021-शनिवार.