II गणपती बाप्पा मोरया II - लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 12, 2021, 05:20:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गणपती बाप्पा मोरया II
                                           लेख क्रमांक-3
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 

                        गणेशोत्सवाचा ज्ञात इतिहास-----

     लोकमान्य म्हणाले, '' हा वंगभंग नाही हा भारत भंग आहे.'' या वाक्यामुळे पंजाबपासून मद्रासपर्यंत सर्वत्र बंगालच्या फाळणीच्या विरोधात आंदोलन उभे राहिले. बंगालमधील चळवळीला प्रथम महाराष्ट्रातून आणि नंतर प्रत्येक प्रातांतून प्रतिसाद मिळाला त्यातूून बंगालमधील प्रत्येक माणूस शहारला.त्याचाच परिणाम म्हणजे काही दिवसानंतर लोकमान्यांच्या स्वागताचा प्रचंड मोठा कार्यक'म आयोजित झाला. त्या प्रचंड सभेत लोकमान्य येत असताना रविंद्रनाथ टागोर यांनीही अशाच प्रभावी शब्दात त्यांचे वर्णन केले. हजारो लोकांच्या मधून लोकमान्य सभास्थानाकडे जात होते. त्यावर रविंद्रनाथ एवढेच म्हणाले,

     '' हा तर शिवाजी '' या एका जादुई शब्दाचा परिणाम म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत केवळ महाराष्ट्र आणि बंगाल एकत्र आले किंवा त्याच बरोबरीने पंजाबही त्यात आला असे नव्हे तर प्रत्येक प्रं त सहभागी झाला. वंगविरोधाची चळवळ हा कांही गणेशोत्सवाचा भाग नव्हता पण एकदा निर्माण झालेले स्फुलिंग प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवत असले. त्याचे ते उदाहरण होते.

     याच काळातील गणपतीबाबत अजून एक संदर्भ महत्वाचा आहे. तो लोकमान्य टिळकांच्या काळातील असला तरी त्यांना निराळे महत्व आहे. तो म्हणजे गणेश या दैवताबाबत ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी या दैवताबाबत केलेला उल्लेख. त्यांनी 1900 ते 1915 या काळात असे लिहून ठेवले आहे की, अजून स्वातंत्र्य मिळायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. पण जेंव्हा स्वातंत्र्य मिळेल तेंव्हाच्या तरुण पिढीने 'बृहद् भारताच्या सीमा निश्चित कराव्या.' त्या सीमा निश्चित करण्याचे सूत्र असे की, जेथे म्हणून गणपती हे दैवत पोहोचले आहे, तेथे बृहद् भारताच्या चतुस्सीमांच्या खुंट्या ठोकाव्यात. विदेशातही जेथे आज गणपती आहे तेथे एकेकाळी बृहद्भारत विस्तारला होता, हे लक्षात घ्यावे. सध्याच्या पारतंत्र्याच्या काळात हे खरे वाटणार नाही व स्वातंत्र्य मिळाल्यावरही लगेच याची प्रचीती येणार नाही पण त्या पुढील शंभर वर्षात हे स्पष्ट होणार आहे.

     अनेक परंपरांबाबत अशी स्थिती दिसते की, त्याचा त्या काळातील हेतू विस्मरणात जातो. आणि नंतर फक्त काही ठोकळेबाज कर्मठता शिल्लक राहते. त्या त्या वेळी ज्या बाबी शिल्लक राहतात त्यातूनच त्याचे स्वरुप लक्षात घेतले जाते फारसा मागे जाण्याचा त्रात घेतला जात नाही. पण सार्वजतिक गणेशोत्सवाचे स्वरुप व्यापक होत असल्याने याबाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.


                           (साभार आणि सौजन्य-मोरेश्वर जोशी, पुणे)
                                     (संदर्भ-माझा पेपर.कॉम)
                         ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2021-रविवार.