II गणपती बाप्पा मोरया II - गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा -शुभेच्छा क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 12, 2021, 05:24:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II गणपती बाप्पा मोरया II
                               गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
                                       शुभेच्छा क्रमांक-3
                              -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची  गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 


                                   गणेश चतुर्थी शुभेच्छा
                                 ---------------------


गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास...
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना...
गणपती बाप्पा मोरया!!

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे...
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

_(_e_)_
l,l~"~l,l
"( ("
,) )
वक्र तुंड महाकाय,
सूर्य कोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा...
हैप्पी गणेश चतुर्थी!

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना...
गणपती बाप्पा मोरया!!

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची...
गणपती बाप्पा मोरया!

प्रथम वंदन करूया,
गणपति बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज "ओंकारा"
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज "विघ्नहर्ता"
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज "एकदंता"
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज "गणपती"
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज "वक्रतुंड"
शक्तिमान तुझे सोँड..
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया...!


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                  -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2021-रविवार.