II गणपती बाप्पा मोरया II - लेख क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 13, 2021, 05:04:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गणपती बाप्पा मोरया II
                                           लेख क्रमांक-4
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 

                          गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती-----

     "वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा"
हिंदु धर्मीयांची आराध्यदेवता श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात.

     गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे.

                    गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती –

     घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो. त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते. प्रत्येक जण आपल्या पंरपंरेप्रमाणे त्याची पुजा अर्चना करतात.

     कुठे बाप्पा संपुर्ण दहा दिवस, कुठे पाच दिवस, कुठे दिड दिवस तर कुठे अगदी एक दिवसाकरीता देखील येतो.

                               श्री गणेशाची मुर्ती –

     श्री गणरायाची मुर्ती ही मातीचीच असावी असा नियम आहे. शक्यतो शाडु मातीची मुर्ती बसवावी किंवा काळया मातीची देखील मुर्ती चालेल परंतु आजकाल सुबक आणि रेखीव म्हणुन प्लॅस्टर ऑफ पॅरीस च्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा जो प्रघात पडला आहे तो पर्यावरणाकरता हानिकारक असल्याने आपण मातिच्याच मुर्तीचा आग्रह धरावा.

                             प्रतिष्ठापनेची पुजा –

     श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतांना पार्थिव मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर फुलं दुर्वा पत्री अर्पण करून अखेर नैवेद्य आणि आरती अशी प्रथा आहे.

     भाद्रपद महिन्यात पावसाचे दिवस असल्याने सगळीकडेच हिरवळ पसरलेली असते आणि विविध वनस्पती उगवलेल्या असतात. त्यामुळे सोळा पत्री श्री गणेशाला अर्पण करण्याची प्रथा असावी. या पत्रींमधे अधिकतर पत्री या औषधी असल्याचे आपल्याला आढळते.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.09.2021-सोमवार.