"हिंदी दिवस"- लेख

Started by Atul Kaviraje, September 14, 2021, 12:27:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हिंदी दिवस"
                                            लेख
                                     ----------------
मित्र/मैत्रिणींनो,

       आज दिनांक-१४.०९.२०२१-मंगळवार आहे. आजच्या दिवसाचे महत्त्व हे आहे की आज "हिंदी दिवस"आहे. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे महत्त्व व इतर माहिती.

                            Hindi Diwas-14.09.2021   

To uphold the importance of Hindi as the national language of India which was adopted as the official language of Constituent Assembly on 14th September 1949.

     भारतामध्ये हिंदी दिवस 14 सप्टेंबर दिवशी का साजरा केला जातो? या दिवसाच्या
14 सप्टेंबर 1949 दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहलेल्या हिंदी भाषेचा भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिवसाचं औचित्य साधून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.
   
     भारतामध्ये हिंदी दिवस 14 सप्टेंबर दिवशी का साजरा केला जातो?-----

     भारतामध्ये 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस (Hindi Diwas) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून भारतामध्ये हिंदी भाषेतलं सौंदर्य, त्यामधील साहित्य जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. भारत हा विविधतेमध्ये एकता जपणारा देश आहे. या देशात जशी संस्कृती बदलते तशी भाषादेखील बदलते मात्र उत्तर भारतासह बहुसंख्य राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलाली जाते. राष्ट्रीय हिंदी दिवसाचं औचित्य साधून देशभरात सरकारी कार्यालयामध्ये खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याद्वारा हिंदी या भारताच्या राजभाषेचा प्रसार केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढील 2 वर्षात म्हणजेच 14 सप्टेंबर 1949 दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहलेल्या हिंदी भाषेचा भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिवसाचं औचित्य साधून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.

     भारतामध्ये हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी तत्कालीन सरकार विशेष प्रयत्न करत होते परंतू देशातील काही राज्यांकडून करण्यात आलेल्या विरोधानंतर हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला यासोबतच इंग्रजी देखील राजभाषा बनवण्यात आली आहे. त्यामुळे भारताची कोणतीही राष्ट्रभाषा नाही.

                         हिंदी भाषेबद्दल काही काही इंटरेस्टिंग गोष्टी-----

     भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी भाषेचे महत्त्व ओळखून पहिला हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1953दिवशी साजरा केला. भारतामध्ये हिंदी भाषेला असलेला राजभाषेचा देण्यासाठी इंग्रजी हटवण्याची मागणी करण्यात आली मात्र या पार्श्वभूमीवर देशात आंदोलन सुरू झाली. तामिळनाडूमध्ये जानेवारी 1965 मध्ये भाषावादावरून दंगली देखील पेटल्या होत्या. 1918 साली महात्मा गांधी यांनी हिंदी साहित्य संमेलनामध्ये हिंदी भाषेला राष्ट्रभाषा बनवण्याचा मानस बोलून दाखवला होता.

     हिंदी ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.. भारतामध्ये 43.63% लोकं हिंदी बोलतात. आणि देशात हिंदी भाषिकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. 2021 साली इंटरनेटवर इंग्रजीच्या तुलनेत हिंदीचा वापर करणार्‍यांची संख्या वाढू शकते. सुमारे 20.1 कोटी लोकं हिंदीचा वापर करू शकतात. गूगलच्या माहितीनुसार, हिंदी भाषेत माहिती वाचणारे प्रतिवर्षी 94% नी वाढत आहेत तर इंग्रजी वाचणार्‍यांचा दर 17% आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये टॉप 5 भाषांमध्ये हिंदीचाही समावेश आहे. दक्षिण पॅसिफिक मधील मेलानेशिया मधील फिजी नावाच्या आयलंडची हिंदी ही आधिकारिक भाषा आहे. त्याचा लहेजा अवधी, भोजपुरी प्रमाणे आहे. जगात पाकिस्‍तान, नेपाळ, बांग्‍लादेश, अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, न्‍यूजीलैंड, संयुक्‍त अरब अमीरात, युगांडा, गुयाना, सूरीनाम, त्रिनिदाद, मॉरिशस, साउथ अफ्रीका समवेत अनेक देशांत हिंदी भाषिक आढळतात.

     जगात 10 जानेवारी दिवशी 'विश्व हिंदी दिवस' देखील साजरा केला जातो. भारतामध्ये असलेली विविधतेत एकता यादिवशी जपली जाते.


                     (साभार आणि सौजन्य-दीपाली नेवरेकर)
                            (संदर्भ-मराठी .लेटेस्टली.कॉम)
                 ---------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2021-मंगळवार.