II गणपती बाप्पा मोरया II - लेख क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, September 14, 2021, 02:32:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गणपती बाप्पा मोरया II
                                           लेख क्रमांक-5
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची  गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 

                          गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती-----

                                   पुराणकथा –

     पुराणात या सणाची माहिती घेतली असता असे समजते की माता पार्वतीला एकदा स्नानाकरता जायचे असतांना बाहेर कुणी पहारेकरी नसल्याने तिने मातीची एक मुर्ती बनवुन त्यात प्राण फुंकले त्याला पहारेकरी नेमुन ती स्नानाला गेली असता बाहेर भगवान शंकर आले.

     पहारेकऱ्याने त्यांना रोखले असता त्यांनी संतापुन त्याचा शिरच्छेद केला. माता पार्वती स्नानाहुन आल्यानंतर झालेल्या प्रकाराने ती प्रचंड संतापली आणि क्रोधीत झाली. तिचा क्रोध शांत करण्याकरता भगवान शंकराने आपल्या सेवकांना प्रथम जे कोणी दिसेल त्याचे शिर आणावयास सांगितले सेवक हत्तीचे शिर घेउन आले असता ते शिर त्या धडावर बसविण्यात आले.

     तो दिवस भाद्रपद महिन्यातला शुध्द चतुर्थीचा दिवस होता आणि तेंव्हापासुन श्री गणेशाचा उत्सव सुरू होण्याची प्रथा सुरू झाली.

     भगवान गणेशाला दुर्वा प्रिय असल्याने त्यांच्या शिरावर वाहाण्याची प्रथा आहे.

     त्याचप्रमाणे नैवैद्यात मोदक अतिप्रीय असल्याने गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात येतो.

                              सार्वजनिक गणेशोत्सव –

     लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी भारतीयांना एकत्र आणण्याकरीता आणि विचारांची देवाणघेवाण करण्याकरीता या उत्सवाची सुरूवात केली होती.

     अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येतं.

    अवघ्या भारतभर विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणामुळे कितीतरी हातांना रोजगार उपलब्ध होतो. कोटयावधीची उलाढाल होतांना आपल्याला दिसते.

     संपुर्ण बाजारपेठ उपयोगी वस्तुंनी भरलेली दिसते. मुर्तीकारांची लगबग तर कित्येक महिने अगोदरपासुन सुरू झालेली पहायला मिळते.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2021-मंगळवार.