II गणपती बाप्पा मोरया II - गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा -शुभेच्छा क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, September 14, 2021, 02:38:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II गणपती बाप्पा मोरया II
                                    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
                                            शुभेच्छा क्रमांक-5
                                  ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 

                                   गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
                               ---------------------------------

गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा-----

ओम सर्वमंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते.
जेष्ठा गौरी आगमनाच्या..
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा...

हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली...
आपणा सर्व प्रिय जणांना..
माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या,
हार्दिक शुभेच्छा...

आज गौरी आगमन
गौरीच्या प्रवेशाने
तुमच्या घरात,
सुखं शांती आणि धनधान्याची..
भरभराट होऊ दे...


आतुरता बाप्पाच्या आगमनाची------

देव येतोय माझा...
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची...

श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधिशाची स्वारी आली
गणपती बाप्पा मोरया!

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची...
गणपती बाप्पा मोरया!

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली...
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी,
आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी
केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज!

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची |
पूजा बांधिली माणिका मोतियांची ||
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची |
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची ||

गणपती तुझे नांव चांगले |
आवडे बहु चित्त रंगले ||
प्रार्थना तुझी गौरी नंदना |
हे दयानिधे! श्रीगजानना ||


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                 ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2021-मंगळवार.