"इंजिनीअर्स डे-अभियंता दिन" - लेख

Started by Atul Kaviraje, September 15, 2021, 12:19:18 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "इंजिनीअर्स डे-अभियंता दिन"
                                         लेख
                           ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०९.२०२१-बुधवार. आजच्या दिवसाला  "इंजिनीअर्स डे-अभियंता दिन" म्हणून विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया, या दिनाचे विशेष महत्त्व, माहिती, आणि इतर बरंच काही.


   September 15--Engineer's Day

To commemorate the birthday of the legendary engineer Sir Mokshagundam Visvesvaraya.

     अभियंता दिन (इंजिनीअर्स डे) चं महत्त्व जाणून घेऊया...
इंजिनीअर्स डे विशेष: विश्र्वेश्वरय्या यांचं इंजिनीअरिंगमधील योगदान

भारताचे महान इंजिनीअर आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्र्वेश्वरय्या यांचा जन्मदिन १५ सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणजेच इंजिनीअर्स डे म्हणून साजरा केला जातो. विश्र्वेश्वरय्या यांचं इंजिनीअरिंगमधील योगदान आणि या दिवसाचं महत्त्व जाणून घेऊया....

     एम. व्ही. विश्र्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथील एका तेलुगू कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील संस्कृत पंडित होते. विश्र्वेश्वरय्या यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात घेतले आणि नंतर ते बंगळुरू येथे उच्च शिक्षणासाठी गेले. कला शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ट्रॅक बदलला आणि ते सिव्हिल इंजिनीअरिंग करण्यासाठी पुण्याला गेले. तेथे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून त्यांनी सिव्हील इंजिनीअरिंग केले.

     नदीवरचे बंधारे, पूल, पिण्याच्या पाण्याच्या योजना आदी यशस्वीरित्या तयार करण्यासाठी विश्र्वेश्वरय्या यांनी मोलाचे योगदान दिले. त्या काळात कृष्णराज सागर बंधारा, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, मैसूर सँडल ऑइल आणि सोप फॅक्टरी, मैसूर विद्यापीठ, बँक ऑफ मैसूरची निर्मिती विश्र्वेश्वरय्या यांनी केली. बंगळुरूमध्ये १९१७ साली त्यांनी शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना केली. या संस्थेला नंतर त्यांचं नाव देण्यात आलं. ते केवळ इंजिनीअरच नव्हे तर मैसूरचे १९ वे दिवाणही होते.

        शिक्षक दिन विशेष: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन; शिक्षक ते नेता

     महाराष्ट्र सरकारनेही त्यांना नाशिकमध्ये सहाय्यक इंजिनीअर पदावर नियुक्त केले होते. नदीच्या पाण्याला बांध घालण्यासाठी स्टीलच्या विशिष्ट दरवाजांचा शोध त्यांनी लावला. ही १९०३ सालातली ब्लॉक सिस्टिम आजही जगभरात वापरात आणली जाते. १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १०१ वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यानंतर १४ एप्रिल १९६२ साली त्यांचं निधन झालं. त्यांची जयंती देशात इंजिनीअर डे म्हणून साजरी केली जाते.

                             (साभार एवं सौजन्य-मनीषा फाळके) 
                                  (संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                         ------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2021-बुधवार.