वास्तव चारोळ्या-" नेते भरवती जनाशीर्वाद यात्रा, पुढील निवडणुकीसाठी एकमेव मात्रा

Started by Atul Kaviraje, September 15, 2021, 02:21:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    विषय : नेत्यांची जन-आशीर्वाद यात्रा
                        वास्तव राजकारणी चारोळ्या
    " नेते भरवती जनाशीर्वाद यात्रा, पुढील निवडणुकीसाठी एकमेव मात्रा !"
                                  (भाग-2)
----------------------------------------------------------------


(६)
गावच्या "यात्रा" लांबत होत्या
जत्रेच्या गाड्या सुस्तावल्या होत्या
आवडत्या नेत्यास आशिष देण्या,
लोकांच्या माना उंचावत होता.

(७)
डोक्यातून निघालीय कुणाच्या शक्कल
काम नाहीय, पाजळतोय अक्कल
"यात्रेच्या" प्रयोजनाचे कंत्राट घेऊन,
ओढतोय  खोऱ्याने पैसा  बक्कळ.

(८)
आज या-गावी तांड्याने फिरावे
उद्या दुसऱ्या मुक्कामी थांबावे
कार्यकर्त्यांसवें यथेच्छ भोजन वर्षभर,
"यात्रेच्या" नावाखाली मोफत मिळावे.

(९)
"जनाशीर्वाद यात्रेला" नाहीय अर्थ
दिसतोय यात काहीतरी स्वार्थ
जनतेच्या मनात स्थान मिळवून,
साधावा आपला साराच परमार्थ ?

(१०)
जनतेचा उत्साह द्विगुणित होता
आनंद गगनात मावत नव्हता
"आशीर्वाद" घेण्या कुणीतरी येतोय,
जिला कधीच विचारीत नव्हता.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2021-बुधवार.