म्हणी - "आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली"

Started by Atul Kaviraje, September 15, 2021, 02:53:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली"


                                           म्हणी
                                       क्रमांक -40
                          "आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली"
                         -------------------------------------


40. आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली
     ----------------------------------

--अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
--उच्च नीच / गरीब श्रीमंत /देखणा कुरूप इत्यादी भेदभावाचा अनुभव जीवन जगत असताना आपल्याला येतो पण प्रत्यक्ष परमेश्वराच्या दरबारात जन्म मृत्यू च्या बाबतीत कोणताही भेदभाव नसतो .प्रत्येक जण देवाघरी जाताना लाकडाच्या सरणावर जातो .
--एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे.
--महत्त्वाच्या गोष्टीपेक्षा इतर बाबींचा पसाराच अधिक.
--अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
--अगदी अशक्य अशी गोष्ट सांगणे (कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणे).
--आठ हात काकडीची नऊ हात बी किंवा आठ हात लाकडाची नऊ हात ढलपी निघणें शक्य नाही. यावरून असंभाव्य, अतिशयोक्तीची गोष्ट. ''गेल्या तीस शतकांत आम्ही एवढे मात्र केले की 'आठ हात लाकूड व नऊ हात ढलपी अशा मासल्याचीं-अकटोविकट पुराणें रचून ठेविली?''
--Exaggeration of extreme stupidity.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2021-बुधवार.