"१5 सप्टेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, September 15, 2021, 03:07:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-15.09.२०२१, बुधवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "१5 सप्टेंबर – दिनविशेष"
                                    -------------------------


अ) १५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
    ----------------------------

१८१२: नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.

१८२१: कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन.

१८३५: चार्ल्स डार्विन जहाजातून गॅलापागोस द्वीपात पोहोचले.

१९१६: पहिल्या महायुद्ध – पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर.

१९३५: भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.

१९३५: जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.

१९४८: भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.

१९४८: एफ-८६ सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.

१९५३: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.

१९५९: प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.

१९५९: निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते.

१९६८: सोव्हिएत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

१९७८: तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.

२०००: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.

२००८: लेहमन ब्रदर्सया वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी.

२०१३: निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.

=========================================

ब) १५ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१२५४: इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी मार्को पोलो यांचा जन्म. (मृत्यू: ८ किंवा ९ जानेवारी १३२४)

१८६१: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)

१८७६: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९३८)

१८८१: इटालियन ऑटोमोबाइल अभियंते एत्तोरे बुगाटी यांचा जन्म.

१८९०: इंग्लिश रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९७६)

१९०५: नाटककार, समीक्षक व हिंदी कवी राजकुमार वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९०)

१९०९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९६९)

१९०९: स्वा. सैनिक, सहकारी चळवळीतील नेते रत्नाप्पा कुंभार यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९९८)

१९२१: रंगभूमी अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर २००६)

१९२६: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आग्रा येथे जन्म.

१९३५: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक दगडू मारुती तथा दया पवार यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६)

१९३९: अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म.

१९४६: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच माईक प्रॉक्टर यांचा जन्म.

१९८९: न्यूझीलंडचा संगीतकार चेतन रामलू यांचा जन्म.

=========================================

क) १५ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
    --------------------------

१९९८: गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन.

२००८: साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)

२०१२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९३१)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2021-बुधवार.