वास्तव चारोळ्या - "इडलीवाल्याचे मनोगत"-(भाग-2)

Started by Atul Kaviraje, September 16, 2021, 01:39:19 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                   विषय : सायकलवरचे भोंगाधारी इडलीवाले
                          "इडलीवाल्याचे मनोगत"
                              वास्तव चारोळ्या
                                 (भाग-2)
                ------------------------------------------


(६)
आबाल वृद्ध ऑफिस कर्मचारी
सारे करिती इथे न्याहारी
वेळही वाचतोय, खिशालाही परवडतोय,
स्वाद "इडली-वड्याचा" जिभेवर भिनतोय.

(७)
सूर्योदयापूर्वीच  होते आमची पहाट
सुरु होतात, "इडली-वड्याचे" रगडे पाट
"इडली" सुरेख तयार होते,
पण झोपेचे खोबरे होते.

(८)
आज अनेक माणसे जोडलीत
सर्व धर्माची एकत्र आलीत
कमाई आहे थोडी-थोडकीच यात,
माणसे येताहेत आज माणसात.

(९)
दुर्लक्षित मी समाजाचा घटक
परि खवय्यांच्या गळ्यातील ताईत
इतरांना नगण्य असलो जरी,
खाणाऱ्यांना ते असते माहित.

(१०)
सुरु आहे असेच जीवन
"भोंगा' वाजत, "सायकल" चालते
उदार निर्वाहाचे एकचं साधन,
यावरच माझे घर चालते.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2021-गुरुवार.