म्हणी - "अळी मिळी गुप चिळी"

Started by Atul Kaviraje, September 16, 2021, 04:11:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली"


                                           म्हणी
                                        क्रमांक -41
                                 "अळी मिळी गुप चिळी"
                               -------------------------


41. अळी मिळी गुप चिळी
    ----------------------

--रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
--कधीकधी सगळ्यांनी मिळून एखाद्या गोष्टीवर अधिक चर्चा न करणे किंवा समस्या विकोपाला जाऊ नये म्हणून गाजावाजा न होऊ देणे . एकमेकांच्या सहमतीने एखादी गोष्ट/बातमी/माहिती लपवून ठेवणे .
--स्वतःच्या मनातील गोष्टीबाबत कोणालाही कळू न देणं.
--रहस्य उलगडू नये म्हणून सर्वांनी शांत बसणे.
-- आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसणे.
--रहस्य उघडीस येऊ नये म्हणून गोष्टीला गिळून बसणे.
--आपले रहस्य गुपित ठेवण्यासाठी दुसऱ्याला  गप करणे.
--रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वानी गप्प बसणे.
-- कांहीं न बोलणें ; गप्प बसणें . ( लहान मुलांच्या खेळांतील शपथ ). यावेळीं अळीमिळीगुपचिळी हें वेदसूत्र आठवतें ना ? या वेळीं आधीं बोलेल त्यानें भांडीं घासावीं - हाच मुलाचा बाप .
-- न बोलण्याची शपथ घालणें , ताकीद करणें .
--स्वताच्या मनातील हेतूचा दुसर्याला सुगावा न लागू देण.
--Everyone swallowed the mug so that the secret would not be revealed.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  --------------------------------------------

                                       कविता क्रमांक-१
                                   "अळी मिळी गुपचिळी"
                                 -----------------------


"सगळं होतंय ना मनासारखं
मग झालंय काय चेहेरा पाडायला ?"
प्रश्न तेच पुन्हा पुन्हा...
"सुख बोचतंय..... दुसरं काय..."
उत्तरंही तीच.... त्यांचीच
पण बोलणार नाही मी...!!
का सगळं बोलून दाखवायचं...
का सगळं उघडून दाखवायचं...
मीच माझं कुलूप उघडायचं,
आणि वेदनांचं प्रदर्शन करायचं.
मग प्रत्येकाची सहानुभूती ओसंडून वाहणार
मीच ती गोळा करायची
माझ्यासाठी....... ??
छे; कशाला.....
मी नाहीच बोलणार....
......
नकोय मला बिचारेपण
नकोय सहानुभूती
गोंजारतेय हल्ली व्यथांनाच
जपतेय त्यांची intensity
बरं चाललंय हो आमचं
हल्ली चांगले मित्र मिळणं सुद्धा कठीण झालंय
पण हा दोस्त टिकलाय बराच
बघू किती दिवस देतोय साथ
सध्या तरी रमलेय त्यात
अहो, उसंतच देत नाही तो
बाकी काही करायला
म्हणून तर शिकलेय आजकाल
दु:खालाच गोंजारायला
ट्रेनिंग घेतेय सध्या चेहेरा हसरा ठेवण्याचं.
"प्रॅक्टीस कर... नक्की जमेल" म्हणाला तो
त्यात काय एवढं .....
मी आणखी काही वेदना देतो.
कित्ती सोप्पंय ..!!.
मी सगळं त्याचं अगदी मनापासून ऐकते
मज्जा येतेय....
निघतेय सोलवटून,
रक्ताळलेय...
पण प्रत्येक थेंबाला आस
आणखी नव्या दु:खाची.
बाकी पाश सारे सुटलेत...
तुटलेत...
कधी......
कळलंच नाही
मीच तोडलेत... ????
की तेच घाबरलेत.....
तुझ्या माझ्या यारीला...
बरंच झालं,
आता नाही येणार प्रश्न कुणाचे
नाही द्यावी लागणार उत्तरंही.
आत राज्य तुझंच...
प्रत्येक डाव तुझाच
खेळ तुझी खेळी
माझी फक्त अळी मिळी गुपचिळी !!


                      (साभार आणि सौजन्य-जयवी-जयश्री अंबासकर)
                                     (संदर्भ-मायबोली.कॉम)
                   ---------------------------------------------


                                          कविता क्रमांक-2
                                      "आळी मिळी गुप चिळी!"
                                    --------------------------


आळी मिळी गुप चिळी!
तू पेटव चिता,
त्यावर मी भाजतो पोळी..

आळी मिळी गुप चिळी!
तू शोध साधू,
त्याना मी देतो सुळी..

आळी मिळी गुप चिळी!
तू बनव शत्रू,
त्याना मी देतो हाळी..

आळी मिळी गुप चिळी!
तू लागल्यासारखे कर,
मी ठोकतो आरोळी..

आळी मिळी गुप चिळी!
अर्धे शतक माझे
आता आली तुझी खेळी..

आळी मिळी गुप चिळी!
मी नागवलेच आहे,
आता तू फेडशील ती वेगळी..


                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मिसळपाव .कॉम)
                     --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2021-गुरुवार.