II गणपती बाप्पा मोरया II - कविता क्रमांक-8- गणपती मोदक आरती

Started by Atul Kaviraje, September 16, 2021, 04:48:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II गणपती बाप्पा मोरया II
                                           कविता क्रमांक-8
                                    --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार पासून यंदाची गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 


                                     गणपती मोदक आरती
                                  -----------------------

गणपतीचे आगमन होताच
तांदळाच पीठ घरी येतं
आणि त्या पाठोपाठ खोबरं
खसखस गूळ सारे हजर होतात.

कुकर स्वच्छ होतो
उकड निघते आणि मग
मोदकाचा घाट मार्गी लागतो
सारणाची तयारी झाली की आई सुटले म्हणते.

खरं सांगू ते पहाटे पहाटे
तिचं तयार होणं, आवरणं
सारी लगबग आणि ती पण
सर्वत्र लक्ष ठेऊन होत असते.

विड्याची पानं, सुपारी, चिल्लर
तांदूळ, अक्षता, दुर्वा, आगाडा, फुल, केळी,
पंचखाद्य सारं तोंडपाठ, भर भर झांझासह
आरती पुस्तकाला घेऊन उजळणी होते.

तोवर उकड काढून मळून चांगली पारी
मना प्रमाणे हातावर तयार होते
गोड सारण पोटात टुंम भरलं की
उकडीला कुकर मध्ये जाऊन बसते.

तोवर पूजा विधी आटपतोच
इतक्यात गणरायालाही मोदकाचा
छान खमंग वास भावतो
आणि प्रसन्न चित्ताने तो आरतीला हजर होतो.

सुखकर्ता पासून सुरु होणारी
आरती मंगलमूर्ती मोरया म्हणून संपते
मंत्राक्षता मंगलाष्टक झालं की
हळूच गणपती मोदक हातावर देतो.

खरं सांगू मी मोदक हातावर
येई पर्यंत कधी डोळे उघडत नाही
त्यामुळे गणपती बाप्पाच.
प्रसाद देतो ही भावना टिकून आहे.

मोदकाची अवीट गोडी
अजूनही तशीच टिकून आहे
म्हणून तर गणपती बाप्पा
सदैव मोदकासाठीच प्रसन्न चित्ताने घरी येत आहे.

म्हणून सांगावे वाटते मला
मोदक करावेत सुबक सुंदर चविष्ट
माफक प्रमाणात वापरून गोड गुळ
ज्याने प्रसन्न होतो गणेश, हे कृपेचे मूळ......!

                कवी-प्रशांत  शिंदे
              ------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                     -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2021-गुरुवार.