"महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार" - "स्वामी विवेकानंद"

Started by Atul Kaviraje, September 16, 2021, 11:10:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                           "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार"
                                        "स्वामी विवेकानंद"
                                        "मार्गदर्शक विचार"
                          --------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे मार्गदशक विचार" या मालिके-अंतर्गत आज ऐकुया, "स्वामी विवेकानंद" यांचे अनुभवी, थोर, आणि मार्ग-दर्शक विचार ( विचार पुष्प क्रमांक-१ )

                                  " मार्गदर्शक विचार पुष्प क्रमांक-१ "
                                ---------------------------------


स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार-----

     एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकाण्ड विद्वान होते. स्वामी विवेकानंदानी  'योग', 'राजयोग' आणि 'ज्ञान योग' असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे, ज्याचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल. कन्याकुमारी येथे बांधलेले त्यांचे स्मारक अजूनही  स्वामी विवेकानंदांच्या  महान कार्याची कथा सांगते.

     स्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व होते. ज्यांनी अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला  जीवन शिकवले , एक तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे असलेले स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प्रभावी होते, जर एखाद्याने त्यांच्या जीवनात त्यांचे विचार लागू केले तर यश निश्चितच प्राप्त होते – एवढेच नाही तर विवेकानंदांनी लोकांना त्यांना प्राप्त झालेल्या आध्यात्मिक विचारांनी  सुद्धा लोकांना प्रेरित केले, त्यातील काही विचार खालीलप्रमाणे आहे चला तर मग वाचूया-----


--उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका........


– स्वामी विवेकानंद
  ----------------


                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठीभाऊ.कॉम)
                      ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2021-गुरुवार.