संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”

Started by Shweta261186, March 31, 2010, 03:23:20 PM

Previous topic - Next topic

Gourav


जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही... दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही...॥धृ॥

फुल मनाचे खुडून...दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
देठ पिकल्या फुलांना..देठ पिकल्या फुलांना...देठ पिकल्या फुलांना..
भय निर्माल्याचे नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही... ॥१॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही... दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही...

तुला द्यावे मन.. असे काही कारण नव्हते...
एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..
पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..
ज्याला दिसतच नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही... ॥२॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही... दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही...

मनाविण जगताना, वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही..वाटे आश्चर्य सखेद
मला एक मन भारी..मला एक मन भारी..मला एक मन भारी..
तुला दोन्ही जड नाही..
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही... ॥३॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही... दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही...

                          --- संदीप खरे

Great ........ekdam zakkas .. best .. i was searching for this ... with only two words  " JA JA"..... n finally got it with the two letters ......
thank you very much....................

sandipkharefan