II गणपती बाप्पा मोरया II - IIअनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा II-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 19, 2021, 03:46:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II गणपती बाप्पा मोरया II 
                          IIअनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छाII 
                                       लेख क्रमांक-2
                        -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज १९ सप्टेंबर, २०२१-रविवार, आज बाप्पा आपल्या गावी परत चालले आहेत. आज गणेशोत्सवाची सांगता होत आहे. १० दिवस कसे भुरकन उडून गेले, ते कळलेच नाही. आजच्या अनंत चतुर्दशी दिनाच्या सर्वाना शुभेच्छा.  बाप्पांची वाट पाहूया, ते पुढील वर्षी पुन्हा आपल्या भेटीस येणारच आहेत, तोपर्यंत आपल्या दिनक्रमात आपले मन गुंतवूया. वाचूया, तर या दिनाचे महत्त्व, माहिती, शुभेच्छा, आणि इतर बरंच काही.

                     अनंत चतुर्दशीचे महत्त्व, तिथी आणि मुहूर्त-----

अनंत चतुर्दशीचे व्रत हिंदू धर्मात अतिशय महत्वाचे असते. या दिवसाला अनंत चौदस असेही म्हटले जाते. हा दिवस भगवान विष्णूंच्या अनेक अवतारांच्या स्मरणाचा असतो.
कधी आहे अनंतचतुर्दशी? जाणून घ्या १४ अवतारांशी जोडलेल्या या पर्वाचे महत्व  |  फोटो अनंत चतुर्दशीचा सणभगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केली जाते पूजायादिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने पूर्ण होतात सर्व इच्छा.

     नवी दिल्ली: हिंदू दिनदर्शिकेत (Hindu calendar) भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौदाव्या दिवशी अनंत चतुर्दशी असते. हा सण उत्सव आणि बंधुतेचे प्रतिक आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची (Lord Vishnu) पूजा केल्यानंतर हातावर एक धागा बांधला जातो. हा धागा रेशमाचा किंवा सुती असू शकतो आणि यात १४ गाठी असाव्या लागतात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाची सांगता देखील याच दिवशी होते. कारण अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपती विसर्जनही (Ganesh Visarjan) केले जाते. पूर्ण देशात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

                      अनंत चतुर्दशीचे महत्व-----

     पौराणिक कथांनुसार अनंतचतुर्दशीच्या सणाची मुळे महाभारताशी जोडलेली आहेत. हा दिवस भगवान विष्णूशी जोडलेला असल्याचे म्हटले जाते. विधात्याने १४ लोक, तल, अटल, वितल, सुतल, तलातल, रसातल, पाताल, भी, भुवन, जन, तप, सत्य, मह यांची निर्मिती केली.

     यांचे पालन करण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी १४ वेगवेगळे अवतार घेऊन देव या नश्वर जगात आला, ज्यामुळे त्याला अनंत असे नाव पडले. या अवतारांनी एक प्रमुख भूमिका बजावली. यासाठी अनंत चतुर्दशीचा दिवस महत्वाचा असतो, कारण यादिवशी सृष्टीच्या स्वामीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी पूजा केली जाते.

                     अनंत चतुर्दशीचे नेमके महत्व काय?-----

     यादिवशी केले जाणारे व्रतही महत्वपूर्ण असते. हे सर्व या सर्वांना प्रसन्न करण्यासाठी आणि आनंदी आणि संतुष्ट जीवनाच्या प्राप्तीसाठी केले जाते. यादिवशी उपवासासह विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.

     हे व्रत धन, प्रचुरता आणि समृद्धीच्या प्राप्तीसाठी केले जाते. पर्याप्त धन, आनंद आणि संतानाच्या प्राप्तीसाठीही हे व्रत भारताच्या अनेक राज्यांमध्ये करतात. यादिवशी विष्णूच्या कथाही ऐकल्या जातात.   


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाइम्स नाऊ मराठी.कॉम)
                --------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2021-रविवार.