म्हणी - "इच्छा तेथे मार्ग "-भाग-2

Started by Atul Kaviraje, September 20, 2021, 04:31:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         म्हणी
                                      क्रमांक -43
                                    "इच्छा तेथे मार्ग "
                                  ------------------

43) इच्छा तेथे मार्ग - भाग-2
    ----------------------

                   उदाहरण-----

                   प्रबळ इच्छा असल्यास मार्ग दिसतो-----

     आषाढी एकादशी जवळच आली होती. एके दिवशी तुकाराम महाराज एकटेच रस्त्त्याने चालले होते. त्यांना त्यावेळी देहूचे पांडोबा समोरून येताना दिसले.

     त्यांना पाहून तुकोबांनी विचारल, "पाटील, आषाढी एकदशीसाठी देहूहून दिंडी निघणार आहे तेव्हा तुम्ही पंढरीच्या वारीला येणार का?"

     तेव्हा पाटील त्यांना म्हणाले, "नाही हो तुकोबा! मला कसे शक्य आहे. मी हा असा संसारात अडकलेला माणूस आहे. त्या संसाराने मला कस घट्ट धरून ठेवल आहे. त्यामुळे मला काही तुमच्याबरोबर दिंडीबरोबर यायला जमणार नाही." त्यांचे ते बोलणे ऐकून तुकोबा शांतपणे त्यांच्या वाटेने निघून गेले.

     दुसऱ्या दिवशी परत पाटील त्यांना दुरून येताना दिसले. त्यांना पाहून तुकोबाने एका झाडाच्या खोडाला आपल्या बाहूत घट्ट पकडले व ते म्हणू लागले, "अरे मला सोड! अरे मला सोड!"

     हा प्रकार पाटीलांनी बघितला ते त्यांना थोडे विचित्र वाटले. आणि ते हसत तुकोबाला म्हणाले, "तुकोबा,तुमच डोक एकदम फिरलं की काय? तुम्हीच त्या झाडाला पकडले आहे व तुम्हीच त्याला सोड म्हणून म्हणता आहात. तुम्ही तुमचे हात काढून घ्या. म्हणजे तुमचा रस्ता मोकळा होईल."

     ते ऐकून लगेच तुकोबा त्यांना म्हणाले, "पाटील, मी तुम्हाला तेच म्हणत होतो की, तुम्हीच संसाराला घट्ट धरून ठेवले आहे आणि तुम्ही म्हणत आहात की 'संसाराने तुम्हाला धरले आहे.' जर तुम्ही फक्त चार-आठ दिवसांसाठी तुमच मन संसारातून काढले तर तुम्हाला आमच्या दिंडीबरोबर येता येईल. जर आपल्या मनात असेल तर आपल्याला नक्कीच मार्ग दिसेल."

     तुकोबांचे हे म्हणणे पाटलांना पटले. त्यांनी लगेचच दिंडीबरोबर जाण्याची तयारी दाखविली.

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीलेख.कॉम)
                        ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2021-सोमवार.