"महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार" - "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक "

Started by Atul Kaviraje, September 20, 2021, 05:18:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार"
                                 "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक "
                                       "मार्गदर्शक विचार"
                         -----------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे मार्गदशक विचार" या मालिके-अंतर्गत आज ऐकुया, "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक " यांचे अनुभवी, थोर, आणि मार्ग-दर्शक विचार ( विचार पुष्प क्रमांक-5)


    भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्य सैनिक तसेच स्वातंत्र्य काळातील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक ज्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड करून आणि जनतेला स्वातंत्र्यासाठी पेटवून उठवले असे महान क्रांतिकारक ज्यांनी तुरुंगात सुद्धा महान ग्रंथ लिहिले, आणि शेवट पर्यंत आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटले, आणि एकच नारा नेहमी दिला स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

     त्या काळातील लोकांना गुलामगिरीत जगण्याची सवय झालेली होती, आणि परकीय शत्रूचा अन्याय सहन केल्याशिवाय पर्याय उरला नव्हता, या गुलामगिरीतुन देशाला मुक्त करण्यासाठी आपल्या देशात अनेक महान आत्म्यांचा जन्म झाला त्यापैकी एक म्हणजे बाळ गंगाधर टिळक त्यांना लोकमान्य टिळक असेही म्हटल्या जात होतं. म्हणतात न क्रांतीसाठी बंड पुकारण्याचे कार्य तेच करू शकतात ज्यांचे विचार खुले असतील म्हणजेच मुक्त विचारांचे लोक, त्या महान व्यक्तींपैकी एक म्हणजे बाळ गंगाधर टिळक, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत बाळ गंगाधर टिळक यांचे काही जीवनाविषयी प्रेरणादायी विचार---

                                " मार्गदर्शक विचार पुष्प क्रमांक-5 "
                                --------------------------------

--"स्वराज्य हा माझा जन्मसिद्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच."

--लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2021-सोमवार.