म्हणी - "इकडे आड तिकडे विहीर"

Started by Atul Kaviraje, September 21, 2021, 03:45:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "इकडे आड तिकडे विहीर"

                                          म्हणी
                                       क्रमांक -44
                                "इकडे आड तिकडे विहीर"
                               --------------------------


44. इकडे आड तिकडे विहीर
    ------------------------

--दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.
--दोन्ही बाजूंनी अडचणीची  परिस्थिती निर्माण होणे.
--संस्कृतपर्याय-इतो व्याघ्र इतस्तरी.
--प्रश्न सोडवताना दोन पर्यायांपैकी कोणताही पर्याय योग्य नसेल तर / दोन्ही बाजूने नुकसान अशी परिस्थिती तर असे म्हणतात . आड म्हणजे विहिरीप्रमाणेच पाणी साठवण्याची जागा . जिथे लपायला जागा नाही.
--दोन्ही बाजूनी संकटात सापडणे.
--दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.
--दोन्ही बाजूंनी सारख्याच  अडचणीत सापडणे.
--दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.
--दोन्ही बाजुंनी अडचणीची अवस्था निर्माण होणे.
--दोन्हींकडून सारख्याच अडचणीत सापडणे.
--एका बाजूला आड व दुसर्‍या बाजूला विहीर, म्हणजे दोन्ही बाजूलाहि संकटे आहेत, कोणत्याहि बाजूस जावयास रस्ता नाही अशी अडचणीची स्थिति. दोन सारख्याच संकटात सापडणें. शृंगापत्ति. तु०- दोन दरडीमध्ये सापडणें. 'एकीकडून आड एकीकडून विहीर दुतर्फा मरण सारखेच'.
--Between the devil and the deep sea. The horns of a dilemma.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  --------------------------------------------

--वाक्य वापर : परिक्षेच्या आदल्या दिवशी वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे प्रणवची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.09.2021-मंगळवार.