"तुझ्या आठवणी म्हणजे.."

Started by vishmeher, April 01, 2010, 06:07:47 PM

Previous topic - Next topic

vishmeher


तुझ्या आठवणी म्हणजे...
मोरपिसाचा हळूवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे...
नकळत निर्माण होणारा हर्ष

तुझ्या आठवणी म्हणजे...
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे...
विरह सागरात हरवलेली नाव

तुझ्या आठवणी म्हणजे...
आयुष्य जगण्याची आशा आणि
तुझ्या आठवणी म्हणजे...
गमवलेल्या गोष्टींची निराशा

तुझ्या आठवणी म्हणजे...
पावसात चिंब भिजणं
तुझ्या आठवणी म्हणजे...
ओसाड वाळवंटात एकटच भटकणं

तुझ्या आठवणींशिवाय
आयुष्यच अर्थहीन आहे
तुझ्या आठवणींचा सहवास
हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!!