‘जागतिक नदी दिन’ - लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 25, 2021, 01:55:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      'जागतिक नदी दिन'   
                                         लेख क्रमांक-3
                                     --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२५ .०९ .२०२१ -शनिवार  आहे. आजचा दिवस हा "जागतिक नदी दिन" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिनाचे महत्त्व, आणि इतर माहिती.

      जगभरातील अनेक मोठी शहरं ही नदीकिनारी वसलेली आहेत. अशात नद्या आणि आपलं आयुष्य हे एकमेकांशी कशाप्रकारे निगडित आहे हे अधोरिखित होतं. आज १४ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवस. जगभरात नदी संरक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी आणि बदलत्या हवामानाचं महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र यामागचा इतिहास, यामागची पार्श्वभूमी आणि याबद्दलच्या काही फॅक्ट तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत.

     आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवस या दिवशी जगभरात काही कार्यक्रम आयोजित केले जातात. यात काही पर्यावरण आणि नदीप्रेमी  एकत्र येऊन नदीला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पांना विरोध करतात. याआधी हा दिवस आंतरराष्ट्रीय धरण विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात होता. नद्यांचं, पाण्याचं आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचं संरक्षण व्हावं म्हणून हा दिवस करण्यात येत होता. भारतातही काही संघटनांकडून यासंदर्भात 'नर्मदा बचाव अभियान' यासारखे कार्यक्रम राबवले होते.

          काय आहे आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवस २०२० चं थिम:-----

     'महिला, नदी आणि हवामान बदल' अशी यंदाच्या आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवसाचं थिम आहे. मागील वर्षी जगातील ३२ देशांच्या १०० महिलांनी नदी संरक्षण करण्यासाठी मेहनत घेतली होती.

     "बदलत्या हवामानामुळे महापूर येतात आणि पाण्याचं प्रदूषण होतं त्यामुळे नद्यांचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. ज्या लोकांनी नदी संरक्षणासाठी आपला आयुष्य वेचलं आहे त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत.आम्ही काही संघटनांसोबत आणि एनजीओसोबत मिळून नदी संरक्षणाचं काम करणार आहोत",असं या महिलांचं म्हणणं होतं.

                  आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवसाचा इतिहास:-----

     नदीवर धरण बांधण्याच्या प्रकल्पग्रस्त नागरिकांची बैठक मार्च महिन्यात १९९७ ला घेण्यात आली होती. ब्राझीलमध्ये ही बैठक घेण्यात आली होती. यानंतर जगातल्या २० देशांनी १४ मार्च हा आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवस म्हणून साजरा करण्याची परवानगी दिली होती. 

     काही देशांमधील धरण प्रकल्पग्रस्त लोकांच्या संघटना नदी वाचवण्याच्या संदर्भात काम करत आहेत. त्यापैकी काही खंड यामध्ये सक्रिय आहेत. आफ्रिका, दक्षिण आशिया, लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका हे खंड आणि या खंडातील काही देश या नदी संरक्षणात सक्रिय सहभागी आहेत.

                             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ सकाळ.कॉम)
                           ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.09.2021-शनिवार.