" लेख " - "हेल्मेट का वापरावे"- भाग-2

Started by Atul Kaviraje, September 25, 2021, 07:16:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                            " लेख "
                                             भाग-2
                                           ---------
   
मित्र/मैत्रिणींनो,

      "हेल्मेट" या विषयावर एक सुंदर लेख वाचूया, आणि  या लेखातील आशय समजून घेऊया. या लेखाचे शीर्षक आहे- "हेल्मेट का वापरावे"

हेल्मेट का वापरावे-----

   कॉलेजकुमारांची अडचण तर विचारात घेण्यासारखीच आहे कारण हेल्मेट वापरल तर त्यांची हेअर स्टाईल खराब होते मग मुली कश्या इम्प्रेस होतील. यापेक्षा नकोच ते हेल्मेट आणि हेल्मेट न वापरणाऱ्या मुलिंच देखील बरोबर आहे कि स्कार्फ असताना हेल्मेट कशाला वापरायच आणि कधी चुकून वापरलच तर हेल्मेटच्या काचेतून सूर्याची अतिनील किरणे त्यांच्या चेहऱ्यावर पडली तर केवढा मोठा अनर्थ होईल. पुन्हा ब्युटीपार्लर मध्ये जा, यापेक्षा स्कार्फ अगदी उत्तम. घट्ट बांधल्यावर ऑक्सिजन देखील फिल्टर होऊन येतो. मग अतिनील किरणांचा तर प्रश्नच नाही.

     खरतर मित्रांनो या तोट्यापेक्षा हेल्मेट वापराचे फायदेच जास्त आहेत. हेल्मेटचा उपयोग अपघातापासून संरक्षण फक्त एवढाच नसून त्याचे इतरही बरेच फायदे आहेत. जसे कि वाऱ्यापासून, धुळीपासून, डोळ्याचे, चेहऱ्याचे संरक्षण. तुम्ही जास्त प्रवास करा तरी देखील तुम्हाला फ्रेशनेस जाणवतो म्हणजे प्रवासानंतरचा थकवा जाणवत नाही. बरीच लोकं प्रश्न करतात तू हेल्मेट का वापरतोस असं विचारणाऱ्यास तुम्ही विचारा तुम्ही हेल्मेट का वापरत नाहीत ? मग त्यांना आपोआपच उत्तर मिळेल. हेल्मेटच्या काचेतून समोर पाहण्याचा फील वेगळाच आहे तो म्हणजे रोडवर फिरणाऱ्या वाहनांकडे तुम्ही स्थिरपणे पाहता. तुम्हाला रोडवरील वाहनांचा गोंगाट जास्त जाणवत नाही. बऱ्याच तरुणांमध्ये एक फॅड आहे ते म्हणजे गाडीचे आरसे काढून टाकण्याचे ! कदाचित त्यांना मागे वळून पहायला जास्त आवडत असेल म्हणून, पण जर तुम्ही हेल्मेट वापरत असाल तर तुमच्या गाडीला आरसे असायलाच हवे, आणि आपण तरुण कितीही निधड्या छातीचे असलो तरी न हेल्मेट वापरणाऱ्याच्या तोट्यापेक्षा, हेल्मेट वापराचे फायदे जास्तच आहेत. मग दुचाकी गाडी चालकाने हेल्मेट वापरले तर कुठे चुकते ?

     जगात भारतामध्ये दुचाकी वाहनाचा अपघात होण्याच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे. भारतापाठोपाठ चीनचा नंबर लागतो, आणि हेल्मेट वापरले तर अपघातात मृत्यूचे प्रमाण जवळजवळ ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घटू शकते. भारतात दुचाकी चालकासाठी हेल्मेट वापरायचे नियम आहेत, पण त्याचे सक्तपणे अंमलबजावणी होत नाही. काटेकोरपणे नियम पाळले जात नाहीत. अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये दुचाकी वाहनांचे अपघातांचे प्रमाण कमी आहे. अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे, कारण तेथे हेल्मेट वापरायचे प्रमाण जास्त आहे. अमेरिका- ऑस्ट्रेलियात फक्त मोटरसायकलिंसाठीच हेल्मेट सक्ती नाही तर सायकल चालकांसाठीही हेल्मेट सक्ती आहे. तेथील लोकं हेल्मेट वापरतातही. या देशांमध्ये ट्राफिक नियमांचे सक्तपणे अंमलबजावणी केली जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नियमांनुसार दुचाकी चालकाने हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. विकसित देशांत चारचाकी वाहनांच्या अपघाताचे प्रमाण दुचाकी वाहनाच्या अपघातापेक्षा जास्त आहे. दुचाकी अपघातात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. पण हेल्मेट वापरल्यास मृत्यूचे प्रमाण घटते.

     अहमदनगर शहराचा विचार केला तर शहरात हेल्मेट वापराचे प्रमाण तुरळक आहे. दुचाकी वापरापैकी अंदाजे १०-१५ टक्केच लोकं हेल्मेट वापरतात, म्हणून अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढते.

         लेखक-अभिजीत हजारे.
        ----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कॉलेज कट्टा.कॉम बेस्ट)
                  -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.09.2021-शनिवार.