"महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार" - "महात्मा गांधी"

Started by Atul Kaviraje, September 26, 2021, 04:21:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                           "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार"
                                        "महात्मा गांधी"
                                      "मार्गदर्शक विचार"
                          ---------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे मार्गदशक विचार" या मालिके-अंतर्गत आज ऐकुया, "महात्मा गांधी" यांचे अनुभवी, थोर, आणि मार्ग-दर्शक विचार ( विचार पुष्प क्रमांक-11)

     भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून महात्मा गांधी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. अंहिसेची कास धरत त्यांनी असहकाराच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी लोकांना कायम प्रवृत्त केलं. अशा या थोर व्यक्तीची जयंती देशभरात 2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येते. देशासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या जयंतीला नव्या पिढीलाही त्यांच्या कामगिरीची आठवण राहणे गरजेचेच आहे. म्हणूनच या गांधीजयंतीला तुम्ही गांधीजींचे विचार नक्कीच शेअर करा. इतर कोणत्याही दिवसांप्रमाणे तुम्ही नक्कीच गांधी जयंतीच्याही शुभेच्छा द्या.

     महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांचे वडील तत्कालीन काठेवाड प्रांतातील दिवाण होते. अत्यंत धार्मिक वातावरणात त्यांचे बालपण गेले. त्यामुळेच त्यांच्यावर त्याचा पगडा होता. अहिंसा, शाकाहार,सहिष्णुता हे सगळे गूण त्यांच्यात चांगलेच बिंबलले गेले होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्यासोबत झाला.

     शालेय शिक्षण संपवून गांधीजीची उच्च शिक्षणासाठी इंग्लडला गेले. लंडन विद्यापीठात त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले.  इंग्लडमध्ये गेल्यानंतर काही काळ तेथील पद्धती समजून घेण्यात त्यांना वेळ गेला. शिवाय परदेशात शाकाहाही पदार्थ मिळत नसल्यामुळे त्यांना ते पदार्थ मिळेपर्यंत उपाशी राहावे लागे. परदेशात शाकाहारी माणसे शोधून त्यांनी एक संघटना स्थापन केली आणि ते त्याचे अध्यक्ष बनले. ज्यावेळी ते देशात वकिली करु लागले. त्यावेळी त्यांना एखादा मुद्दा मांडणे अजिबातच जमत नव्हते. त्यांचा स्वभाव लाजाळू असल्यामुळे ते कोर्टात फार बोलत नसतं.

     गांधीजींनी त्यांच्या वयाची 21 वर्ष ही साऊथ आफ्रिकेत घालवली आहेत. जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली. त्यानंतर ते भारतात परतले. गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले. पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांच्या क्रोधाचा उद्वेग झाला आणि अनेक ठिकाणी हिंसक विरोध झाले. गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच त्यानंतरचे हिंसक विरोध दोन्हींचा निषेध केला. त्यांनी या दंग्यांना बळी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांबद्दल सहानुभुती दर्शविणारा आणि दंग्यांचा निषेध करणारा एक ठराव मांडला. या ठरावाला काँग्रेसमध्ये सुरुवातीला विरोध झाला.१९२०च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी  राजकारणापासून दूर राहिले आणि त्यांनी आपले लक्ष स्वराज्य पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील मतभेद दूर करण्यावर केंद्रित केले. या काळात त्यांनी समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि गरिबी कमी करण्याचे आपले प्रयत्‍न चालू ठेवले. राजकारणाच्या पटावर ते इ.स. १९२८ मध्ये परत आले.


--"इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा.. तुम्हाला तुमचा 'स्व' सापडेल."

--महात्मा गांधी


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .पॉप xo.कॉम )
                ------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.09.2021-रविवार.