"विश्व पर्यावरण स्वास्थ्य दिवस"- स्लोगन्स

Started by Atul Kaviraje, September 26, 2021, 05:45:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "विश्व पर्यावरण स्वास्थ्य दिवस"
                                               स्लोगन्स
                                -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०९.२०२१-रविवार आहे. आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे आज "विश्व पर्यावरण स्वास्थ्य दिवस" आहे. जाणून घेऊया, या दिवसाचे महत्त्व, स्लोगन्स, लेख व इतर माहिती.

                       विश्व पर्यावरण स्वास्थ्य दिवस स्लोगन्स-----


1. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा.

2. झाडे जगवा झाडे वाचवा.

3. पर्यावरणाचे करा रक्षण,उज्वल भविष्याचे हेच धोरण.

4. वृक्षतोड करू नका, भविष्य धोक्यात टाकू नका.

5. कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी.

6. सांभाळा ओझोनचा थर, शरीरातील कमी होईल ज्वर.

7. प्रत्येकजण पर्यावरणाची काळजी घेईल, तर आपला देश महान होईल.

8. काम करा लाख मोलाचे, निसर्ग आणि त्याच्या संवर्धनाचे.

9. दररोज पाणी द्या झाडांना, भविष्य मिळेल मुलांबाळांना.

10. पर्यावरणाची करा रक्षा, जीवनाची खरी सुरक्षा.

11. झाडे लावा झाडे जगवा, भविष्य वाचवा जीवन फुलवा.

12. पर्यावरणाचे करा जतन, निसर्गासाठी खर्च करा तन आणि धन.

13. निसर्गाचा नाश म्हणजे मानवी जीवनाचा सर्वनाश.

14. घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवा, प्रदूषणाला दूर करा.

15. निसर्ग आणि पर्यावरण हाच आहे खरा तुमचा मित्र.

16. जागतिक पर्यावरण दिन साजरा करू, जागोजागी झाडे लावू.

17. गाऊ महती पर्यावरणाची, भिती नाही भविष्याची.

18. पर्यावरण दिनाचे महत्त्व, सुखी जीवनाचे आहे खरे तत्त्व.

19. चिऊ काऊला चारापाणी, निसर्गाची मेहरबानी.

20. अंगणात लावा वृक्षवेली, आरोग्याची गुरूकिल्ली.

21. पर्यावरण राखा, आरोग्य राखा.

22. फळांच्या बी अंगणात टाक, निसर्ग देत आहे हाक.

23. पर्यावरणाचे सुंदर चक्र, भविष्यासाठी ठरेल सुदर्शन चक्र.

24. स्वच्छ परिसर स्वच्छ गाव, आजारपणाला दूर ठेव.

25. स्वच्छता ठेवा गल्लोगल्लीत, निसर्गाचे चक्र चालेल सुरळीत.


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्मित क्रिएशन.कॉम)
                    --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.09.2021-रविवार.