रेल्वे वास्तव चारोळया - " रेल्वे-रूळ खडी भरणाऱ्या मजुरांचे मनोगत"-(भाग-2)

Started by Atul Kaviraje, September 27, 2021, 02:16:26 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             रेल्वे वास्तव चारोळया
                " रेल्वे-रूळ खडी भरणाऱ्या मजुरांचे मनोगत"
                                    (भाग-2)
               ----------------------------------------


(६)
कामाचे काय, तयारी आहे काहीही करण्याची
सवाल उभा फक्त पोटाची खळगी भरण्याचा
एका नात्यात बांधले गेलोत आम्ही या समांतर रुळांशी,
सांगड घालायचा करतोय प्रयत्न स्वतःच्या जीवनाशी.

(७)
उन्हाळा,पावसाळा,हिवाळा, सदा-सर्व-काळा
अविरत,कामाला नाही खंड,सुरु असते ते अखंड
पाय सतत असतात चालत,निरंतर, थांबण्याचे नाव नाही,
या रुळांवरून त्या रुळांवर पावलांना थारा नाही.

(८)
जीवन गाडीच्याच गतीने धावते, मुंबईत
येथल्या लोकांना थांबणे नाही माहित
आम्हीही घेतलंय जुळवून या जीवनाशी कधीच,
गाडीच्या भोंग्याशिवाय आम्हा आता करमतच नाही.

(९)
प्लॅटफॉर्मच्या बाजूस कनात उभी आहे आमची
नावालाच घर, चूल पेटतेय इथेच संसाराची
कायम नाही ठिकाणा, विंचवाच्या पाठीवरलं घर,
आज इथे, तर उद्या तिथे,कामाला असतो सदैव तत्पर.

(१०)
कितीही जखमा झाल्या जरी हाताला
हे काम हातातून सोडवत नाही
कुणी नोंद घेवो ना घेवो आमच्या कामाची,
श्रमाने झोप मात्र लागते आम्हा सुखाची.

(११)
रेल्वेने संभाळलंय आजवर,काळजी तीच वाहील उद्याची
नाही भविष्याची चिंता,नसली जरी सोय राहण्याची
आता परतुनी नाही जाणे गावाकडे,विस्मरण झालंय मातीचं,
आवडू लागलंय इथलं काम,वेडच लागलंय इथल्या खडीच.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.09.2021-सोमवार.