“जागतिक पर्यटन दिन” - लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 27, 2021, 02:24:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "जागतिक पर्यटन दिन"
                                         लेख क्रमांक-2
                                   -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२७.०९.२०२१-सोमवार आहे. आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे आज "जागतिक पर्यटन दिन" आहे. जाणून घेऊया या दिनाचे महत्त्व, इतिहास,लेख  व इतर महत्त्वपूर्ण माहिती.

         संधी-----

     स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पर्यटन विभागात नोकरीच्या संधी मिळतात. पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातूनही अनेक पदे भरली जातात. सरकारी नोकरीत येण्यासाठी मात्र या विषयातील पदवीप्राप्त असणे गरजेचे आहे. तसेच अनेक परदेशी कंपन्यात संधीही आहेत. अनेक विमानसेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. खाजगी समूहात व्यवस्थापन आणि आदी बाबींसाठी उत्तम वेतनही मिळते.

                               पर्यटन विभाग-----

    आरक्षण, विपणन, विक्री, नियोजन, मार्गदर्शन यासाठी अनेक जागा भरल्या जातात

                              माहिती साहाय्यक-----

     हा उपलब्ध पर्यटनसंबंधी जागा आणि तिथे मिळणाऱ्या सेवांची तपशीलवार माहिती देण्याचे काम करतो. त्याच्या सहकार्यामुळे प्रवाशांना योग्य नियोजन करण्यास मदत होते.

                        गाईड(मार्गदर्शक)-----

     पर्यटन मंत्रालय गाईडला मान्यता देते. प्रादेशिक, राज्य आणि स्थानिक असे तीन प्रकार त्यात पडतात. हा परवान्याचे दर दोन वर्षांनी नुतनीकरण करता येते. स्थळांची सविस्तर आणि इत्यंभूत माहिती देणे आणि सांस्कृतिक परंपरा आदीची माहिती देण्याचे काम गाईड करत असतो. त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असायला हवे कारण तो प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन मार्गदर्शन करत असतो. एकंदरीत गाईड हा महत्त्वाचा दुवा असतो.

                            टूर ऑपरेटर्स-----

     हे प्रवासाचे संपूर्ण नियोजन करतात. टूर गाईड म्हणून अनुभव आल्यानंतर या पदावर काम करता येते.

                         ट्रॅव्हल एजन्सी-----

     यांचे अनेक लोक ग्राहकांना एजन्सीशी जोडतात. आता ऑनलाइनही ग्राहक जोडता येतात. ग्राहकांशी संवाद साधून अनेक प्लॅन ते देत असतात आणि ग्राहकांना कंपनीशी संपर्क करून देतात.

                         हॉटेल क्षेत्र-----

     पर्यटन आणि हॉटेल क्षेत्र या दोन्हींचा संबंध अनन्यसाधारण आहे. प्रवासात मुक्कामाची सोय करण्याचे काम एकमेकांच्या सहाय्याने केले जाते. यावर आकर्षक सवलती देऊन ग्राहक मिळवण्याकडे कल असतो. जवळजवळ एक लाख कुशल मनुष्यबळाची गरज या व्यवसायाला सध्या आहे.

                         विमान कंपन्या-----

     विमान कंपन्यासाठी काम करणे ही वेगळा आनंद देणारी संधी असते. इतर व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्याने संधी मिळते. त्याचबरोबर आकर्षक वेतनही दिले जाते.

       
                      (साभार आणि सौजन्य-विकिपीडिया .ऑर्ग /विकी)
                           (संदर्भ-विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून)
                   -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.09.2021-सोमवार.