"विश्व हृदय दिवस"-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 29, 2021, 01:54:37 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "विश्व हृदय दिवस"
                                          लेख क्रमांक-2
                                       ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज २९.०९.२०२१-बुधवार आहे. आज "विश्व हृदय दिवस" आहे. जाणून घेऊया, आजच्या दिनाचे महत्त्व, लेख, व इतर महत्त्वपूर्ण माहिती.

जागतिक हृदय दिवस : 'हेल्दी हार्ट'साठी काही महत्त्वाच्या गोष्टी...
हेल्दी हार्टसाठी...

     जगभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लाखोंच्या संख्येत लोक हृदयासंबंधी गंभीर आजाराचा सामना करताना दिसतात. केवळ भारतात प्रत्येक पाचवा व्यक्ती हृदयासंबंधी आजाराने ग्रासलेला असल्याची माहिती आहे. आपल्या शरीरात हृदय एक असा अवयव आहे जो रक्ताभिसरणाचं काम करतो. त्यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला रक्त पुरवलं जातं आणि शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण योग्य प्रमाणात राहतं. पण आजच्या अतिशय धकाधकीच्या आयुष्यात 'हार्ट अटॅक' आणि 'कार्डियक अरेस्ट' यांसारख्या हृदयाच्या आजारांना अनेक जण बळी पडताना दिसतात. जगभरात हृदयसंबंधी आजारांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस 'वर्ल्ड हार्ट डे' किंवा 'जागतिक हृदय दिवस' म्हणून साजरा केला जातो.

                     तणाव आणि हृदयाचा संबंध-----

     तणावाला हृदयाचा शत्रू असं मानलं जातं. त्यामुळे अनेकदा हृदयाच्या आजारांचा थेट संबंध वाढत्या तणावाशी जोडून पाहिला जातो.

     आपण कोणत्याही प्रकारच्या तणावात असू तर मेंदू काही वेगळ्याच प्रकारे काम करण्यास सुरुवात करतो आणि हृदयाचं संपूर्ण कार्यच बिघडलं जातं. त्यामुळे ताण-तणाव जितका दूर राहील तिककं हृदय हेल्दी राहण्यास मदत होऊ शकते.


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-झी न्यूझ .इंडिया .कॉम)
                    -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.09.2021-बुधवार.