चहा- चारोळ्या - " नाक्या-नाक्यांवरील गरम चहाची टपरी "-(भाग-2)

Started by Atul Kaviraje, September 30, 2021, 02:03:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              चहा- चारोळ्या
               " नाक्या-नाक्यांवरील गरम चहाची टपरी "
                                 (भाग-2)
             --------------------------------------


(६)
कोरोनामुळे नोकऱ्या गेल्यात कित्येकांच्या
पर्याय शोधलाय त्यांनी चहाच्या टपरीचा
कसेही करून चालवायचे आहे घर,
किती काळ राहणार डोईवरला उधारीचा भार ?

(७)
टपरीवर उभ्याने चहा पिण्याची मजाच और असते
येथे कधीही जाती-पाती, लहान-मोठ्यांचे बंधन नसते
चहाला कधीही भरपूर ग्राहक उपलब्ध असते,
पावसाळ्यात तर ओल्या तना -मनास उष्ण-ऊब मिळत जाते.

(८)
आज प्रत्येक नIका शोभतोय चहांच्या टपरीने
त्याशिवाय रस्त्याचे वळण पूर्णच होत नाही
तिन्ही ऋतू, तिन्ही त्रिकाळ, तल्लफ कधीही लागते,
चहाशिवाय दुजे काहीच अमृत-तुल्य नसते.

(९)
एवढासा कटिंगही जिभेला चटका देऊन जातो
रेंगाळणारी आपली चव जिभेवर ठेवून जातो
अर्ध-भरलेला गरम प्याला, आपल्याला बोलावीत असतो,
नकळत पावलांना तो टपरीची ओढ लावत असतो.

(१०)
रोजगाराचे एक हमखास साधन हे
यापाठी मेहनत,आणि खूपच कष्ट मात्र हवे
गरिबांना एक दिलासा,एक आसरा दिलाय या चहाने,
चहाच्या धंद्यास सहारा दिलाय या टपरीने.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.09.2021-गुरुवार.