"लोकमत सखी -मीच ती !"-"फिटनेस"-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 30, 2021, 11:48:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "लोकमत सखी -मीच ती !"
                                            "फिटनेस"
                                           "गोमुखासन"
                                          लेख क्रमांक-१
                                 ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

    आजपासून, "लोकमत सखी -मीच ती !"  या मालिकेतील, "फिटनेस" या सदरात एक महत्त्वाचे आसन यावर लेख वाचूया. या आसन लेखाचे शीर्षक आहे- "गोमुखासन"


>फिटनेस > गोमुखासन; हे आसन महिलांनी अवश्य करायला हवं! एका जागी बसून व्यायम करण्याचे 9 फायदे.
=========================================

     तज्ज्ञ सांगतात की निरोगी शरीरासाठी गोमुखासन हे एक आवश्यक आसन आहे. या आसनाचा फायदा म्हणजे शरीरातील स्नायू आणि हाडं यामुळे मजबूत होतात. मन शांत आणि एकाग्रचित्त होतं. हे आसन नियमित केल्यास वजन देखील कमी होतं.

     Gomukhasana; Women must do this exercise. 9 benefits of this exercise. This exercise is important for women. गोमुखासन; हे आसन महिलांनी अवश्य करायला हवं! एका जागी बसून व्यायम करण्याचे 9 फायदे.

      हे आसन घालताना ज्या प्रकारची मांडी घातली जाते ती गोमुखाप्रमाणे दिसते, म्हणून या आसनाला गोमुखासन असं म्हणतात. हे आसन महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं समजलं जातं.

     गोमुखासन नियमित केल्यास शरीर सुडौल , लवचिक आणि आकर्षक बनतं.         
एका जागी बसून केलेल्या व्यायामानेही वजन कमी होतं, शरीर सुडौल होतं , अनेक आजार बरे होतात आणि मन:शांती देखील मिळते, असं म्हटल्यास विश्वास बसेल? योगसाधनेतील गोमुखासन हे एवढंच प्रभावी साधन आहे. तज्ज्ञ सांगतात की निरोगी शरीरासाठी गोमुखासन हे एक आवश्यक आसन आहे. या आसनाचा फायदा म्हणजे शरीरातील स्नायू आणि हाडं यामुळे मजबूत होतात. मन शांत आणि एकाग्रचित्त होतं. हे आसन नियमित केल्यास वजन देखील कमी होतं.

     गोमुख म्हणजे गाईचा चेहेरा. हे आसन घालताना ज्या प्रकारची मांडी घातली जाते ती गोमुखाप्रमाणे दिसते, म्हणून या आसनाला गोमुखासन असं म्हणतात. हे आसन महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं समजलं जातं. संधिवात, बध्दकोष्ठता, मधुमेह आणि कंबरदुखी या समस्यांमधे हे आसन परिणामकारक ठरतं. तसेच ज्यांना अपचन, शरीरातील धातू दोष, भूक कमी लागणे, पाठ दुखी, लैंगिक विकार, श्वेत पदराचा त्रास, मूळव्याध यासारखे त्रास असतील त्यांनी गोमुख आसन करायलाच हवं.

                        गोमुखासन कसं करावं?-----

     गोमुखासन करण्यासाठी सर्वात आधी सुखासनात बसावं. उजवा पाय डाव्या पायावर ठेवावा. या स्थितीत दोन्ही पायांचे गुडघे हे वर असतात. आता उजवा हात डोक्याच्या बाजूने वर करुन पाठीच्या दिशेनं खाली आणावा. डावा हात कोपरात वाकवून पाठीमागे न्यावा. हात पाठीच्या दिशेने वर ठेवावा. आता या अवस्थेत दोन्ही हात एकमेकात गुंफण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हात गुंफले गेले की शरीराची अवस्था एका सरळ दिशेत ताठ होते. या अवस्थेत किमान एक किंवा दोन मिनिटं राहाण्याचा प्रयत्न करावा. नंतर सावकाश आसन सोडून दहा सेकंद विराम घ्यावा. मग डावा पाय उजव्या पायावर ठेवून डावा हात डोक्याच्या दिशेनें सरळ नेऊन पाठीच्या दिशेने खाली आणावा तर उजवा हात पाठीमागे नेऊन पाठीच्या दिशेनं वर नेत दोन्ही हात एकमेकात गुंफावेत. किमान दहा मिनिटं उजवा आणि डावा पाय असं आलटून पालटून हा व्यायाम केल्यास अपेक्षित परिणाम दिसतात. गोमुखासन करताना सुरुवातीला हात एकमेकात गुंफले जायला अवघड असतं. पण सरावानं ते जमतं. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात हात गुंफले जातील असा अट्टाहास चुकीचा ठरतो. या आसनाचा कालावधी हळुहळु वाढवत न्यावा.

                      गोमुखासनाचे फायदे-----

1. गोमुखासन नियमित केल्यास शरीर सुडौल , लवचिक आणि आकर्षक बनतं.
2. वजन कमी करण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.
3. मधुमेह असलेल्यांनी हे आसन केल्यास त्याचे फायदे होतात.
4. स्तन छोटे असल्यास त्यांचा आकार वाढवण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.
5. फुप्फुसांचं कार्य सुधारण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.
6. श्वसनासंबंधित विकार या आसनामुळे कमी होतात.
7. थकवा, तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी हे आसन महत्त्वाचं आहे.
8. पायांच्या स्नायुंना पीळ पडला असल्यास ते कमी होतं आणि पायाचे स्नायू बळकट होतात.
9. गोमुखासन नियमित केल्यास कंबरदुखी बरी होते.


                       (साभार आणि सौजन्य-लोकमत सखी-मीच ती !)
                                    (संदर्भ -लोकमत .कॉम)
                     --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.09.2021-गुरुवार.