गंभीर चारोळ्या-"दरड कोसळली धडाधड डोंगरावरून,कोरोनाला गेले सारेजण विसरून."

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 01:48:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                सद्याचे वास्तव चित्रण
                                   गंभीर चारोळ्यI
    "दरड कोसळली धडाधड डोंगरावरून,कोरोनाला गेले सारेजण विसरून."
                                      (भाग-2)
   ----------------------------------------------------------------


(६)
आज एक संकट,उद्या दुसरे, तर परवा तिसरे
ही मालिका सुरूच राहील का अशीच कोठवर ?
जगायचे कसे आणि कसे-बसे,सांगा आपणच मित्रांनो,
एक निस्तरता,दुसरं असते आ वासून उभे उंबरठ्यावर !

(७)
चंद्रावर गेलोय, भविष्यात मंगळही गाठायचे ठरलेय
अरे माणसा, पण पहा इथे, पृथ्वीवर काय चाललेय ?
आधी तुझेच जीवन सुधार, सगळीकडे सुख-शांती नांदू दे !
नंतरच अवकाशाला गवसणी घालायचे स्वप्न तुझे पूर्ण होऊ दे !

(८)
आज ढगफुटी, उद्या महापूर, परवा दुष्काळ,तेरवा जल-दुर्भिक्ष्य
सांगा मानवाने कुठे-कुठे द्यायचे आपले मर्यादित लक्ष ?
नाहीतर एक वेळ असाही येईल, तोकडी पडून ताकद,
त्याचाच जाईल बळी, सहजच होईल या साऱ्यांचेच तो भक्ष्य.

(९)
काल होता कोरोनाचा उद्रेक, आज कोसळताहेत दरडी
उद्या येईल पूर-महापूर, परवा पसरेल वणव्याच्या धूर
शक्ती थिटी मानवाची निसर्गापुढे, ताकद पडतेय तोकडी,
आता त्याने करावे तरी काय, खोल खाईत मारावी उडी ?

(१०)
कालचे संकट बरे होते, आज येतेय म्हणण्याची पाळी
कलियुगच अवतरलय जणू ,गोष्ट सांगायलाच नको वेगळी
बस, निर्धाराने द्यायचंय तोंड, उगवलीय अमावास्येची रात्र काळी,
जीवन सुरक्षित अन सुरळीत होईल, हा सूर्योदय पाहायचाय केव्हातरी सकाळी.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.