II राष्ट्रपिता महात्मा गांधी II - महात्मा गांधी-जीवन माहिती

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 07:15:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II राष्ट्रपिता महात्मा गांधी II
                                  --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज म्हणजे, ०२.१०.२०२१-शनिवार, रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी/कवयित्री बंधू भगिनींस या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधी याना सर्व भारतवासी प्रेमाने " बापू " असेही म्हणत असत. एक नजर टाकूया त्यांच्या जीवनावर --


                                महात्मा गांधी-जीवन माहिती--
                              ----------------------------

     जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवणा-या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस (२ ऑक्टोबर) जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६१ साली गुजरात मधील पोरबंदर शहरात झाला. गांधीजीच्या वडिलांचे नाव करमचंद तर आइचे नाव पुतळाबाई होते. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा होते. शालेय शिक्षण संपवून वयाच्या १९व्या वर्षी १८८८ मध्ये गांधीजी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. गांधीजी आणि कस्तुरबा यांना चार मुले झाली. हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास.

     गांधीजीचे कार्यअहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजीनी सर्वप्रथम दक्षिण अफ्रिकेत तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. त्यानंतर १९१५ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी चंपारण मधील शेतक-यांना जुलमी कर आणि जमीनदार यांच्याविरोधात एकत्र करुन लढा दिला. त्यानंतर गांधीजीनी केलेल्या दांडी यात्रा, भारत छोडो चळवळ अशा सत्य आणि अहिंसा या तत्वांवर आधारित आंदोलनांनी ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले. गांधीजीनी सत्य आणि अहिंसा या तत्वांचा नुसताच पुरस्कार केला नाही तर ते स्वतः ती तत्वं जगले.

     गांधी जयंती हा दिवस महात्मा गांधींच्या प्रति सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.


                 (साभार आणि सौजन्य-माहिती संकलक : अतुल पगार)
               -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.