II राष्ट्रपिता महात्मा गांधी II- जीवनपट क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 07:18:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II राष्ट्रपिता महात्मा गांधी II
                                  ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज म्हणजे, ०२.१०.२०२१-शनिवार, रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी/कवयित्री बंधू भगिनींस या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधी याना सर्व भारतवासी प्रेमाने " बापू " असेही म्हणत असत. एक नजर टाकूया त्यांच्या जीवनपटावर --

                                  जीवनपट क्रमांक-१
                               --------------------
                                           

     देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अहिंसात्मकरित्या कार्य करणारे क्रांतिकारक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जीवन परिचय-----

     आपण या लेखात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज सरकारच्या विरूद्ध आपले अहिंसावादी या शास्त्राचा वापर करून त्यांना वठणीवर आणणारे महान क्रांतिकारक महात्मा गांधी यांच्या बद्दल आणि त्यांनी केलेल्या बहुमूल्य कामगिरी बद्दल आपण जाणून घेणार आहोत. कुठल्याही प्रकारची शरीर प्रकृती नसताना केवळ अहिंसेच्या बळावर त्यांनी कश्याप्रकारे इंग्रज शासनाला आपल्या देशातून परतून लावले.

     तसचं, त्यांनी केलेली देशांतील सामाजिक सुधारणा, अस्पृश्यतेचे निवारण  करण्यासाठी केलेली महत्वपूर्ण कामगिरी. त्याचप्रकारे त्यांनी घडवून आणलेली हिंदू-मुस्लीम एकजूट अश्या प्रकारच्या अनेक बाबी आपण या लेखाच्या मध्यमातून जाणून घेणार आहोत. देशाच्या स्वातंत्र्यकालीन इतिहासातील महानक्रांतिकारक, शांतता व अहिंसेचे पुजारक महात्मा गांधी यांचा जन्म सन २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात मधील पोरबंदर या शहरात झाला होता.

     महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते परंतु, लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत असतं. रवींद्रनाथ टागोर यांनी बापूना सर्वप्रथम "महात्मा" ही उपाधी धारण केली होती. तसचं, सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना "राष्ट्रपिता" म्हणून पहिल्यांदा संबोधले होते.

                      राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचेविषयी माहिती –
                     ---------------------------------------

                        महात्मा गांधी यांचा अल्पपरिचय –
                      ------------------------------

नाव (Name)   मोहनदास करमचंद गांधी
जन्म (Birthday)-   २ ऑक्टोबर १८६९
जन्मस्थान (Birthplace)-   पोरबंदर, गुजरात
आई (Mother Name)-   पुतळाबाई करमचंद गांधी
वडील (Father Name)-   करमचंद उत्तमचंद गांधी
भावंडे-                       लक्ष्मीदास, करसनदास आणि बहिण तेथेपोरबंदर, गुजरात
मृत्यु (Death)-   ३० जानेवारी १९४८
मृत्यूस्थान-                       नवी दिल्ली, भारत


         महात्मा गांधी यांचे सुरुवाती जीवन आणि कौटुंबिक माहिती –
       -----------------------------------------------------
     
     महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई होतं. महात्मा गांधी यांचे वडिल करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतामधील पोरबंदर या ठिकाणी दिवाण म्हणून काम करीत असतं. करमचंद गांधी यांची चार लग्न झाली होती, पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या, त्यांच्या आधीच्या तीन पत्नींचे प्रसूतीदरम्यान निधन झाले होते.

     करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी पुतळाबाई या महात्मा गांधी यांच्या आई होत. पुतळाबाई या खूपच धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्या सतत उपवास करीत असतं. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर बालवयात केलेल्या धार्मिक संस्कारांचा प्रभाव त्यांच्या पुढील जीवनात दिसून येतो. मोहनदास यांच्या मनावर त्यांच्या बालपणीच अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, व प्राणिमात्रांवर द्या करणे या सारखे अनेक संस्कार त्याच्या आईकडून गिरवण्यात आले होते.

     गांधीजी यांच्या लहानपणी त्यांच्या आई पुतळाबाई त्यांना जैन संकल्प आणि त्यांच्या प्रथांबद्दल माहिती सांगत असतं, यामुळे लहानपणापासून त्यांना उपवास करण्याची ओळ लागली होती. जैन धर्मातील संकल्प आणि प्रथांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला. महात्मा गांधी स्वत: कबूल करतात की, पौराणिक कथा श्रावणबाळ आणि राजा हरीश्चंद्र या दोन कथांचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडला.


                    मोहनदास गांधी यांचा विवाह व शिक्षण –
                  ----------------------------------

     स्वातंत्र्य पूर्व काळात देशात बालविवाह प्रथा अस्तित्वात होती. त्या प्रथेनुसार महात्मा गांधी यांचा विवाह इ.स.१८३३ साली वयाच्या तेराव्या वर्षी कस्तूरबा माखनजी कपाडिया यांच्या सोबत झाला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने "बा' म्हणत. लग्नानंतर महात्मा गांधी यांच्या पत्नी प्रथेप्रमाणे बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच राहिल्या.

     यामुळे गांधी यांच्या शालेय शिक्षणात देखील एका वर्षाचा खंड पडला होता. इ.स. १८८५ साली गांधीजी पंधरा वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याच वर्षी त्यांना एक अपत्य झाले होते परंतु, ते जास्त काळ जगू शकले नाही. यानंतर महात्मा गांधी यांना चार मुले झाली होती,  इ.स. १८८८ साली हरीलाल, इ.स. १८९२ साली मणिलाल, इ.स. १८९७ साली रामदास आणि इ.स. १९०० साली देवदास.


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.