II राष्ट्रपिता महात्मा गांधी II-जीवनपट क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 07:22:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II राष्ट्रपिता महात्मा गांधी II
                                ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज म्हणजे, ०२.१०.२०२१-शनिवार, रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी/कवयित्री बंधू भगिनींस या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधी याना सर्व भारतवासी प्रेमाने " बापू " असेही म्हणत असत. एक नजर टाकूया त्यांच्या जीवनपटावर --


                                 जीवनपट क्रमांक-2
                               --------------------
                                           

                 महात्मा गांधी यांनी शिक्षणा करिता केलेला प्रवास –
               ---------------------------------------------
 
     महात्मा गांधी यांची लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या वडिलांची त्यांना सरकारी नोकरीत दाखल करण्याची इच्छा होती. ई.स. १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले.  उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी इनर टेंपल या गावी राहून भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला.

     लंडन विद्यापीठामधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.  इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना तेथील रीतीरिवाज समजून घेण्यात त्यांचा काही वेळ गेला. इंग्लंडमध्ये सर्व मासाहारी पदार्थ मिळत असल्याने, त्यांना शाकाहारी पदार्थ मिळेपर्यंत उपाशी राहावं लागतं असे. आईला दिलेल्या वचनाशी कटीबद्ध असल्याने त्यांनी त्या ठिकाणी मासाहार,मद्यपान करणे वर्ज्य केले. त्याठिकाणी त्यांनी शाकाहारी माणसे शोधली आणि त्यांची एक संघटना स्थापन केली आणि स्वत: ते त्या संघटनेचे अध्यक्ष बनले.

     गांधीजी लंडन मध्ये ज्या शाकाहारी लोकांना भेटले होते, त्यातील काही लोक ही 'थीयोसोफिकल सोसायटी' चे सदस्य देखील होते. गांधीजीनी त्याठिकाणी राहून तेथील चालीरीती शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्लंड मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बॅरिस्टर बनून सन १८९१ साली ते भारतात आले व येथे आल्यानंतर ते वकिली करू लागले. ज्यावेळी त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांना न्यायादिशा समोर एखादा मुद्दा मांडणे देखील अजिबात जमत नव्हतं. आपल्या लाजाळू वृत्तीच्या स्वभावामुळे ते कोर्टात फार बोलत नसत.


        महात्मा गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेतील प्रवास (१८९३-१९१४) –
      -----------------------------------------------------

     सन १८९३ साली वयाच्या २४ व्या वर्षी महात्मा गांधी हे भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते. दक्षिण आफ्रिका ही एक इंग्रजांची वसाहत होती. त्याठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्याची २१ वर्षे घालविली. त्याठिकाणी गांधीनी आपले राजकीय दृष्टीकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ययाचे बारकाईने धडे गिरविले. महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत असतांना समाजात अस्तित्वात असलेल्या विकलांगपणाची जाणीव झाली.

     भारतीय संस्कृती आणि धर्म यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण भरपूर दूर आहोत याची जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांनी तेथे राहून भारतीय लोकांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत उद्योग, व्यवसाय आणि इतर कामधंद्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भारतीय लोकांचे प्रश्न समजून घेवून त्यांचे निराकरण करण्याचा गांधीनी प्रयत्न केला. त्यांची अशी धारणा होती की, असं केल्याने आपण भारत देशाला समजून  घेऊ.

     दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना गंभीरपणे वांशिक वर्ण भेदाचा सामना करावा लागला. त्याठिकाणी भारतीय लोकांना देण्यात येणारी अपमान जनक वागणूक त्यांनी अनुभवली. एके दिवशी महात्मा गांधी रेल्वेचा प्रवास करीत असतांना त्यांच्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असतांना सुद्धा त्यांना 'पीटर मारित्झबर्ग' येथील रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याने खाली उतरवून तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजीनी त्यांना नकार देताच त्या अधिकाऱ्याने गांधीजींना गाडी बाहेर ढकलून दिले गांधीजी खाली पडले. त्या दिवशी त्यांनी संपूर्ण रात्र फलाटावर काढली होती.


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.