II राष्ट्रपिता महात्मा गांधी II-जीवनपट क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 07:41:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II राष्ट्रपिता महात्मा गांधी II
                                  ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज म्हणजे, ०२.१०.२०२१-शनिवार, रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी/कवयित्री बंधू भगिनींस या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधी याना सर्व भारतवासी प्रेमाने " बापू " असेही म्हणत असत. एक नजर टाकूया त्यांच्या जीवनपटावर ---

                                 जीवनपट क्रमांक-6
                               --------------------
                                           
               असहकार आंदोलना दरम्यान घडलेली चौराचोरी घटना –
              -------------------------------------------------

     सन १९२२ साली उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्हाच्या चौरीचौरा भागात एका शांततापूर्ण  चाललेल्या मिरवणुकीवर पोलीसांनी गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे असहकार चळवळीत सहभागी नागरिक खूप चिडले, त्यांनी प्रतिउत्तर म्हणून तेथील एक पोलीस चौकी जाळून टाकली. या जाळपोळीत एक पोलीस अधिकारी व २२ पोलीस ठार झाले.

     या घटनेची माहिती गांधीजीना समजली तेव्हा त्यांना खुप वाईट वाटलं, ते एकदम अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं लोकांनी असे करायला नाही पाहिजे होत. अहिंसेच्या मार्गावर चालतांना असे प्रसंग उद्भवतातच. गांधीना वाटू लागलं की, आपण असहकार आंदोलन सुरु करून लोकांना अहिंसेच्या मार्गावर चालायला लावलं परंतु, अहिंसेच्या मार्गावर चालणे इतक सोप नाही.

     तसे करणे सर्वांनाच शक्य होणार नाही, म्हणून महात्मा गांधी यांनी आपली असहकार चळवळ मागे घेतली. चौरीचौरा घटना प्रकरणी महात्मा गांधी यांना मार्च १९२२ साली कैद करण्यात आलं. तसेच, गांधीजीनी सुरु केलेल्या "यंग इंडिया" नावाच्या साप्ताहिक पत्रिकेत त्यांनी स्वत: तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिली आहेत अश्या प्रकारचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला.

     त्यामुळे त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. गांधीजी कैदेत असतांना त्यांची तब्येत खराब झाली, त्या कारणास्तव त्यांची सन १९२४ सली तुरुंगातून सुटका करण्यात आली.

                        तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गांधींचे कार्य –
                      -------------------------------------

     सन १९२४ साली आजारामुळे महात्मा गांधी यांची सुटका झाल्यानंतर गांधीजी सन १९२८ सालापर्यंत राजकारणापासून दूर राहिले. या काळादरम्यान त्यांनी स्वराज्य पक्षातील सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मधील सदस्य यांच्यातील मतभेद दूर करण्यावर भर दिला. तसचं, समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि देशातील गरिबी कमी करण्यासाठी त्यांनी  आपले प्रयत्न सुरु ठेवले. सन १९२८ साली महात्मा गांधी राजकरणात पुन्हा सक्रीय झाले.

     महात्मा गांधी राजकारणापासून दूर असतांना सन १९२७ साली ब्रिटीश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासठी 'सर जॉन सायमन' यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती भारतात पाठवली होती. ब्रिटीश शासनाच्या या समितीत एकही भारतीय नागरिक नसल्याने भारतीय पक्षांनी त्या कमिशनवर बहिष्कार टाकला.

     सन १९२८ साली कलकत्ता मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस च्या सभेत एक ठराव पास करण्यात आला. या ठरावानुसार, ब्रिटीश सरकारने भारताला सार्वभौम देशाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच, सरकारने राष्ट्रीय सभेची ही मागणी मान्य न केल्यास, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही पुन्हा असहकार चळवळ सुरु करू असा संदेश सरकारला देण्यात आला.

     राष्ट्रीय सभेतील सदस्य सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांच्या सारख्या अनेक तरुण सदस्यांची तर तात्काळ स्वातंत्र्य मागण्याची इच्छा होती. गांधीजींनी इंग्रज सरकारला उत्तराकरिता दिलेल्या कालावधीत इंग्रज सरकारने काहीच उत्तर दिले नाही. परिणामी, ३१ डिसेंबर १९२९ साली लाहोर शहरात जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात भारताचा ध्वज फडकवून संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

     या दिवसाला कॉन्ग्रेस ने स्वराज्य दिन म्हणून साजरा केला.२६ जानेवारी १९३० रोजी पहिला स्वातंत्र्य दिन सामुदायिक शपथविधी घेऊन साजरा करण्यात आला होता. महात्मा गांधी यांनी शपथेचा मसुदा स्वत: लिहिला होता.

 
                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.