II राष्ट्रपिता महात्मा गांधी II-जीवनपट क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 07:44:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II राष्ट्रपिता महात्मा गांधी II
                                  ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज म्हणजे, ०२.१०.२०२१-शनिवार, रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी/कवयित्री बंधू भगिनींस या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधी याना सर्व भारतवासी प्रेमाने " बापू " असेही म्हणत असत. एक नजर टाकूया त्यांच्या जीवनपटावर --


                                जीवनपट क्रमांक-7
                               ------------------

                                      दांडी यात्रा ---
                                     ------------
                                 
     इंग्रज सरकारने मिठावर कर लावल्याने त्याचा बोजा गरीब जनतेवर पडत असे. समुद्रात मीठ तयार करण्याचा भारतीयांना पूर्ण अधिकार आहे त्यावर इंग्रज सरकारला पायाबंदी करण्याचा कोणत्याच प्रकारचा अधिकार नाही. आपलं हे वाक्य पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधी यांनी १२ मार्च १९३० साली साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला सुरवात केली.

     आश्रमातील आपल्या ७८ स्त्री-पुरुष अनुयायांव्यतिरिक्त अनेक लोक त्यांना येवून मिळाले. महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला सुरुवात करण्याआधीच ब्रिटीश व्हाईसरॉयला याबद्दल माहिती दिली होती. इंग्रज सरकारचा अन्यायकारक कायदा मोडून काढण्याकरीता ही पदयात्रा होती. इंग्रज सरकारची अशी धारणा होती की, यांच्या पदयात्रेने काहीच फरक पडणार नाही.

     महात्मा गांधी यांनी आपली पदयात्रा सुरूच ठेवली वाटेत त्यांना देशातील अनेक लोक येवून भेटली व त्यांच्या पदयात्रेत सहभागी झाली. ५ एप्रिल १९३० रोजी ३८८ किमी चे अंतर पूर्ण करून त्यांची पदयात्रा दांडी येथे पोहचली. ६ एप्रिल च्या पहाटे महात्मा गांधी यांनी आपली नेहमीची प्रार्थना विधी आटोपून घेतल्यानंतर ते समुद्र किनाऱ्याकडे चालत गेले सकाळी ठीक आठ वाजून तीस मिनिटांनी त्यांनी मिठाचा खडा उचलून इंग्रज सरकारने लावलेला मिठाचा कायदा मोडून काढला. या प्रकरणी त्यांना पकडून कैद करण्यात आले, त्यामुळे संपूर्ण देशात हिंसात्मक रित्या आंदोलनाला सुरवात झाली.

     परदेशी कपड्यांची होळी, दारूच्या दुकानांसमोर निर्दर्शन करणे,जंगल सत्याग्रह अश्या प्रकारचे आंदोलन देशभर करण्यात आले होते. महात्मा गांधी तुरुंगात असतांना त्यांच्यासोबत हजारो भारतीय नागरिकांना इंग्रज सरकारने कैद केलं होत. गांधीजींना कैद केल्याप्रकरणी देशांत क्रांतिकारकांच्या चळवळीना आळा घालण्यासाठी इंग्रज सरकारने 'लॉर्ड एडवर्ड आयर्विन' यांच्या नेतृत्वाखाली  महात्मा गांधी यांच्या सोबत करार करण्याचे ठरवले.

     मार्च १९३१ साली गांधी-आयर्विन यांच्यात झालेल्या करारानुसार सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करणे आणि त्याबद्दल्यात कायदेभंगाची चळवळ बंद करणे असे ठरवण्यात आलं.

                  महात्मा गांधी यांनी केलेलं हरिजन आंदोलन –
                ---------------------------------------

     महात्मा  गांधी यांना भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसचे प्रतिनिधी म्हणून लंडन मध्ये होणाऱ्या पहिल्या गोलमेज परिषदे करिता आमंत्रित करण्यात आलं होत. पहिली गोलमेज परिषदे मध्ये केवळ राजे-राजवाडे आणि अल्पसंख्याक यांच्यावर जास्त भर दिल्याने गांधीजी नाराज झाले.

     सन १९३२ साली झालेल्या गोलमेज परिषदे बाबासाहेबांनी मागणी केल्याप्रमाणे ब्रिटीश सरकारने दलितांना वेगळा मतदार संघ देणे मान्य केलं. महात्मा गांधी यांना आंबेडकर यांच्या वेगळ्या मतदार संघाच्या निर्णयाला विरोध दर्शविला. महात्मा गांधीनी याप्रसंगी पुण्याच्या येरवडा तुरुंगात सहा दिवसाचे उपोषण केलं.

     पी.बाळू यांच्या मध्यस्तीने महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात "पुना करार"  झाला. तेथून गांधीनी दलितांसाठी काम करण्यास सुरुवात केली. ८ मे १९३३ साली आत्म शुद्धी करिता २१ दिवसांचे उपोषण केले.


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.