II राष्ट्रपिता महात्मा गांधी II-जीवनपट क्रमांक-9

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 07:49:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II राष्ट्रपिता महात्मा गांधी II
                                  --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज म्हणजे, ०२.१०.२०२१-शनिवार, रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी/कवयित्री बंधू भगिनींस या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधी याना सर्व भारतवासी प्रेमाने " बापू " असेही म्हणत असत. एक नजर टाकूया त्यांच्या जीवनपटावर --

                                 जीवनपट क्रमांक-9
                               --------------------

                       देशाची फाळणी व स्वातंत्र्य – 
                      ---------------------------
                 
     इंग्रज सरकारने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर भारतला स्वातंत्र्य देण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु, सन १९४० साली लाहोर येथे झालेल्या मुस्लीम लीगच्या सभेत मुस्लीम लीगने केलेल्या मागणीनुसार भारताचे दोन भाग करून मुस्लीम बहुल भाग मुस्लीम लीग ला देण्यात येऊन त्यांच एक नवीन राष्ट्र निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली होती.

     मोहमद जिन्ना हे मुस्लीम लीगच्या अध्यक्ष स्थानी होते, त्यांची लीग नवीन राष्ट्र निर्माण करण्याच्या आपल्या मागणीला जोर देत होती. महत्मा गांधी यांना देशाचे विभाजन नको होते. सन १९४६ साली महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसला सूचित केलं की, त्यांनी ब्रिटीश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी मंजूर करू नयेत. परंतु, महात्मा गांधी यांच्या सल्ल्याकडे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळाने दुर्लक्ष केले.

     पंडित जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांना माहिती होत की, आपण ब्रिटीशांच्या शिफारशी मान्य केल्या नाहीत तर राज्य कारभाराची सूत्रे मुस्लीम लीगकडे जातील. यानंतर संपूर्ण भारत भर दंगली उसळल्या, सन १९४६ ते सन १९४८ साला पर्यंत जवळपास पाच हजार लोकांचा या दंगलीमध्ये मृत्यू झाला होता.

     याचा प्रभाव जास्तकरून पूर्वेकडील भागात जाणवला. सन १९४७ साली भारत आणि पाकिस्तान यांना स्वातंत्र्य देताना इंग्रज सरकारने केलेल्या करारानुसार भारत सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये  द्यायचे होते. परंतु सरदार पटेल यांना असे वाटत होते की, पाकिस्तान या पैशाचा वापर युद्धसामुग्री पुरवण्यासाठी करेल.

     म्हणून त्यांनी ते पैशे त्यांना दिले नाहीत, यातून पुन्हा देशांत हिसाचार उसळला. देशांत हिंदू-मुस्लीम यांच्यात सुरु असलेल्या हिंसाचारामुळे गांधीजी खूपच अस्वस्थ झाले.  देशातील हिंसाचार थांबविण्यासाठी काटोक्याचे प्रयत्न सुरु असतांना सुद्धा हिंदू – मुस्लीम नेते एकमेकांना समजून घेण्यास असमर्थता दर्शवित होते.

     दंगल थांबविण्यासाठी आणि पाकिस्तानला सरकारने ५५ कोटी रुपये द्यावे याकरिता महात्मा गांधी आमरण उपोषणाला बसले. महत्मा गांधी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खूप समजविण्याचा प्रयत्न केला परंतु महात्मा गांधी यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. ते शेवट पर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले. गांधीजींनी केलेल्या उपोषणापुढे सरकारचे काहीच चाले नाही, शेवटी सरकारने आपला निर्णय बदलला आणि पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले. यानंतर महात्मा गांधी यांनी आपले आमरण उपोषण बंद केलं.


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.