"आज तुझी मला खूप आठवण येतेय ......"

Started by अतुल देखणे, April 06, 2010, 12:04:28 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

"आज तुझी मला खूप आठवण येतेय ......"


आज तुझी मला खूप आठवण येतेय ......
         भर पावसात एका छत्रीत काढलेली संध्याकाळ आठवतेय,
         चिंब पावसात भीजुन प्यालेली गरम चाय आठवतेय......अन
आज तुझी मला खूप आठवण येतेय ......

         तुझं ते कॉलेज सोडून जाणं आणी तुझ्यामुळे माझं सोडून देणं आता दोघांनाही सलतंय,
         घर आणी बार आता एकच दिसतंय, तुझ्या त्या अबोल प्रेमानेच हे घडतंय..
         उगाच गेलीस दूर अशी मन माझं हरवतेय ...............अन
आज तुझी मला खूप आठवण येतेय ......

          आगळ - वेगळ असलं तरी प्रेम केलं तुझ्यावर .....,
         हेच बोलण्याच ओझं राहीलंं माझ्या मनावर.....
         आता माझ्या प्रेमाची सरीता नीरोप तुला देतेय ......अन
आज तुझी मला खूप आठवण येतेय ......खूप आठवण येतेय ......


अतुल देखणे


अतुल देखणे

धन्यवाद , मराठी हृदय आपलं आभारी आहे....