"जागतिक अधिवास दिन"-लेख

Started by Atul Kaviraje, October 03, 2021, 05:12:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "जागतिक अधिवास दिन"
                                              लेख
                                 -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक-०३.१०.२०२१-रविवार आहे. आजच दिवस "जागतिक अधिवास दिन" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना,  व इतर माहिती.


             October 03---World Habitat Day

"To raise awareness about the need for well -designed and managed public spaces and streets."

               जागतिक अधिवास दिन----

     हा दिवस ३ ऑक्टोंबर किंवा ऑक्टोंबर महिन्याचा पहिला सोमवार या दिवशी साजरा करतात.

     माणसांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या इतर 'उद्योगां' मुळे पशुपक्ष्यांच्या राहत्या जागेवर आक्रमण होतंय हे खरं... पण खुद्द मानवानेही स्वत:ची अशीच स्थिती करून घेतली आहे ! अनिर्बंध शहरीकरणात बरीचशी सुसूत्रता असे दिसते.

                        मूळ संकल्पना व सुरुवात-----

     जगातल्या मोठ्या लोकसंख्येला - विविध कारणांमुळे वन्यजीवांपेक्षाही बिकट स्थितीत राहावे लागते. रोजगार, पिण्याचे पाणी, वहातुक, आरोग्य, वीजपुरवठा, अशासारख्या मुलभूत सोयींपासून दूर असलेले कोट्यावधी लोक आहेत. स्रिया, मुले, वृध्द यांना फार त्रास होतो. याबाबत ठोस काम करून प्रत्येकाला डोक्यावर छप्पर मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९८५ मध्ये योजना मांडली. त्यानुसार १९८६ पासून दर वर्षी वेगळ्या विषयावर काम केले जाते.

                          अधिक माहिती-----

     विकसनशील देशांमध्ये गेल्या दोन दशकांत शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढला. परिणामी असंतुलित विकास निर्माण होऊन शहरांची लोकसंख्या फुगत गेली आणि मुलभूत सोयी अपु-या पडू लागल्या. २०१४ ची थीम होती. 'झोपडपट्टीमुक्त शहरे' - तेथील रहीवाशांना सोयी पूरवण्याबाबत शहरांचे योग्य नियोजन करण्यासारख्या विषयांचाही विचार केला जातो.

                    आपण काय करू शकतो ?-----

     विस्थापित, स्थलांतरीत तसेच वंचित स्थानिकांना शाश्वत जीवन पुरविण्यासाठीच्या योजना राबविणे. तसेच अनियंत्रित व एकागी शहरीकरण आणि 'विकास' टाळणे. मानवी अधिवासाबाबतच्या स्थानिक परिस्थितीचे योग्य निरीक्षण व नोंदी या दिवसाच्या निमित्ताने ठेऊन या विषयाबाबत सजग राहणे हेच या मागचे उद्दिष्टय आहे.


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विकासपीडिया.इन)
                -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.10.2021-रविवार.