"शिक्षक दिन"-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, October 05, 2021, 12:20:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "शिक्षक दिन"
                                         लेख क्रमांक-१ 
                                      ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक-०५ .१०.२०२१-मंगळवार आहे. आजचा दिवस "शिक्षक दिन" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.


                   October 05---World Teacher's Day

"To mobilize support for teachers and to ensure that the needs of future generations will continue to be met by teachers."

शिक्षक दिन मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन चारोळी शायरी ----

                 शिक्षक दिन 2021 माहिती-----

                शिक्षक दिन भाषणाची सुरवात प्रस्ताविक----

गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ।।

     दिगगजांच्या कलागुणांनी नटलेल्या अन् कृतज्ञतेच्या भावनांनी बहरलेल्या या संस्कारपीठावर विराजमान असलेल्या सर्वच उपस्थितांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो...

     विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊ समाजाला योग्य दिशा देणा-या माझ्या तमाम गुरुजनांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, 'गुरुजनंवर्ग व माझ्या बालमित्रांनो. आज ५ सप्टेंबर म्हणजेच 'शिक्षकदिन' शिक्षकांचा त्यांच्या कार्याबद्दल गुणगौरव करण्याचा दिवस.

     स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षकदिन हा दिवस सर्व देशामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

     1962 साली ते राष्ट्रपतीपदावर विरामाजन झाले होते. तेव्हा काही शिष्य आणि प्रशंसकांनी त्यांना त्यांचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे असं त्यावेळी राधाकृष्ण यांनी सांगितलं.

     शिक्षक दिनाच्या दिवशी देशाचे राष्ट्रपती, राज्याच राज्यपाल ते गावातील मान्यवर मंडळी मोठ्या उत्साहाने शिक्षकांचा गुणगौरव करत असतात.

     'शिक्षक दिन' म्हणजे चिंतनाचा दिन होय. शिक्षका हा शब्द जरी तीन अक्षरांचा असला तरी या तीन अक्षरी शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. शि' म्हणजे शिल. 'क्ष' म्हणजे क्षमा आणि 'क' म्हणजे कला ज्याच्याकडे शिल, क्षमा, कला यांचा त्रिवेणी संगम आहे तोच खरा शिक्षक होय. शिक्षक म्हणजे लाखो विद्यार्थाचे भवितव्य घडविणारा खरा शिल्पकार आहे.

                       [शिक्षक दिन चारोळी-1]
                     ------------------------

गुरूबद्दल सांगायचे झाल्यास...

जो द्रव्य वाढवितो
तो काळजी वाढवतो,
परंतु जो विद्या वाढवितो,
तो मान वाढवतो.
हे कार्य फक्त शिक्षकच करतो.

                      शिक्षक दिन चारोळी-2
                    ----------------------

थोडक्यात माझ्या शिक्षकांसाठी दोन ओळी--

"प्रेमाचे शब्द, स्नेहाचा स्पर्श,
आपुलकीची नजर, कौतुकाची थाप,
सदैव मदतीचा हात, असे आहेत आमचे गुरुजी खास.

     भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापास शिक्षकांना खूप मोलाचे व आदराचे स्थान आहे.  परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आज समाज बदलतो आहे. या बदलत्या सामाजिक परस्थितिला सामोरे जात असताना शिक्षण पद्धतीही बदलत आहे आणि शिक्षकांची भूमिकाही बदलत आहे. शिक्षकांनी शिकवायचे आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचे ही शिक्षण पद्धत कालबाह्य होत आहे.

     विद्यार्थ्यांना शिकवण्या ऐवजी शिकण्यासाठी प्रवृत्त करून पोषक वातावरण निर्माण करणे व योग्य वेळी त्याला साहाय्य करणे अशी नवीन भूमिका शिक्षकांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच शिक्षकांचे आपल्या कार्यातील स्थान बदलत आहे.

     जीवनात येणा-या आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास होणे गरजेचे आहे.

     हिंदीमध्ये एक सुविचार आहे 'फटे हुए दूध को देखकर वही आदमी 'निराश होता है; जो फटे हुए दूध॑से पनीर बनाना नही जानता.

     आपल्या वर्गामध्ये विविध बुद्धिमत्तेची, वेगवेगळ्या आवडी निवडीची व विविध सुप्तगुण असणारी मुले असतात. केवळ लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे. तो एक शिक्षण प्रक्रियेचा भाग आहे.

     विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देख त्यांचे सुप्त गुण ओळखून त्या सुप्त गुणांच उपजत शक्तींचा विकास करून त्याला. समर्थपणे जीवन जगण्यास प्रवृत्त करणारे शिक्षकच श्रेष्ठ ठरत असतात:

     आज विविध क्षेत्रातील ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे. क्रीडा, संगीत, कला, कौशल्प विकास अशा विविध क्षेत्रात अनेक शिक्षक आपले योगदान देऊन सकस समाज निर्मितीत

     आपला मोलाचा सहभाग नोंदवत आहेत. अशा कर्तृत्ववान शिक्षकांचा आपण सन्मान करायला हवा, त्यांच्या चरणी लीन व्हIयला हवे.

                         शिक्षक दिन समारोप----

शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन--

गुरू घेऊनि माझा भार !
शिकविती पोटतिडिकीने फार !!
आयुष्याच्या वळणावर आज !
गवसला मज बोधवृक्षाचा पार !!

     शिक्षण प्रक्रियेत कार्य करत असताना विद्यार्थ्यांत राष्ट्रभक्ती, समाजसेवाभाव निर्माण करून त्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावून त्यांचे जीवन उजळून टाकणा-या गुरु जनाच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.  जय हिंद !


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीभाषण.कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.10.2021-मंगळवार.