"शिक्षक दिन"-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 05, 2021, 12:24:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          "शिक्षक दिन"
                                          लेख क्रमांक-2
                                        ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक-०५ .१०.२०२१-मंगळवार आहे. आजचा दिवस "शिक्षक दिन" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.


     आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.

     `गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.

     भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो. मूळात शिक्षक दिनाची सुरुवात कशी झाली? जागतिक स्तरावर शिक्षक दिन कधी साजरा केला जातो?

              ५ ऑक्टोबरला का साजरा करतात शिक्षक दिन----

     भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली, तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतामध्ये सर्वप्रथम सन १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणे माझ्यासाठी गौरवास्पद असेल, असे राधाकृष्णन यांनी सांगितल्याची आठवण सांगितली जाते.

           कोणत्या देशात केव्हा साजरा करतात शिक्षक दिन----

     युनेस्कोने ५ ऑक्टोबर हा दिवस आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केला आहे. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. साधरण २० व्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली. जागतिक स्तरावर वेगवेगळ्या दिवशी का होईना, पण हा दिवस साजरा करतात. चीनमध्ये १९३१ मध्ये 'नॅशनल सेन्ट्रल यूनिव्हर्सिटी'मध्ये शिक्षक दिनाची सुरुवात करण्यात आली. सन १९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस २७ ऑगस्ट हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून त्याला मान्यता मिळाली.

--लेखिका प्रियांका  वाणी
   --------------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स .कॉम)
               ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.10.2021-मंगळवार.