"नवरात्रोत्सव"-दिवस पहिला

Started by Atul Kaviraje, October 07, 2021, 01:39:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "नवरात्रोत्सव"
                                          दिवस पहिला
                                          "घटस्थापना" 
                                           रंग पिवळा
                                      ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. आज देवीची घटस्थापना आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आज जाणून घेऊया, घटस्थापनेच्या दिनाचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, मंत्र, पूजेचे साहित्य, आणि इतर माहिती. (आजच्या दिवसाचा रंग पिवळा आहे.)

     नवरात्रोत्सव : घटस्थापना कशी करावी? पाहा, विधी, महत्त्व, मान्यता---

     घटस्थापना करण्यासाठी नेमक्या कोणत्या प्रकारचे पूजा साहित्य असावे? घटस्थापनेसाठीचे मंत्र आणि पूजा विधी काय आहे? याविषयी पं. राकेश झा यांच्याकडून
शारदीय नवरात्रात सुख, शांतता आणि समृद्धीसाठी घटस्थापना केली जाते. यंदा गुरुवार , 0७ ऑक्टोबर २०२१ , रोजी घटस्थापनेने नवरात्रारंभ होत आहे. यावर्षी आपणही घटस्थापना करू इच्छित असाल, तर कोणत्या प्रकारचे पूजा साहित्य असावे?

              नवरात्र घटस्थापनेचे साहित्य----

     घटस्थापना करण्यासाठी माती, पितळेचा तांब्या. पूजेसाठी जव, तीळ, सप्तमृतिका, सर्वोषधी, मध, लाल वस्त्र, कुंकू, नारळ, दीप, सुपारी, गंगाजल, आंब्याचे डहाळे, नाणी, विड्याचे पान.

                      घटस्थापनेचा मंत्र----

     घटस्थापनेसाठी पूजास्थळी बसल्यानंतर प्रथम स्वतःला आणि संपूर्ण पूजा साहित्य मंत्राने पवित्र करून घ्यावे. 'ॐ अपवित्रः पवित्रोवा सर्वावस्थां गतोऽपिवा। यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥', असा मंत्र म्हणावा. हा मंत्र म्हणून दर्भाने कलशातील पाण्याने आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर प्रोक्षण करावे. उजव्या हातात अक्षत, फूल, जल, विडा, नाणी आणि सुपारी घेऊन नवरात्र दुर्गा पूजनाचा संकल्प करावा.

                    शारदीय नवरात्र संकल्प मंत्र-----

     ॐ विष्णुर्विष्णुर्विष्णु:, ॐ अद्य ब्रह्मणोऽह्नि द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे, अष्टाविंशतितमे कलियुगे, कलिप्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतखण्डे भारतवर्षे पुण्य (आपल्या क्षेत्राचे वा भागाचे नाव घ्यावे) क्षेत्रे बौद्धावतारे वीर विक्रमादित्यनृपते: २०७७, तमेऽब्दे शार्वरी नाम संवत्सरे सूर्य उत्तरायणे शरद ऋतो महामंगल्यप्रदे मासानां मासोत्तमे आश्विन मासे शुक्ल पक्षे प्रतिपदायां तिथौ शनि वासरे (गोत्राचे नाव घ्यावे) गोत्रोत्पन्नोऽहं अमुकनामा (स्वतःचे नाव घ्यावे) सकलपापक्षयपूर्वकं सर्वारिष्ट शांतिनिमित्तं सर्वमंगलकामनया- श्रुतिस्मृत्योक्तफलप्राप्त्यर्थं मनेप्सित कार्य सिद्धयर्थं श्री दुर्गा पूजनं च महं करिष्ये। तत्पूर्वागंत्वेन निर्विघ्नतापूर्वक कार्य सिद्धयर्थं यथामिलितोपचारे गणपति पूजनं करिष्ये। 'यथोपलब्धपूजनसामग्रीभिः कार्य सिद्धयर्थं कलशाधिष्ठित देवता सहित, शारदीय नवरात्र श्री दुर्गा पूजनं महं करिष्ये।

    शारदीय नवरात्रोत्सव : घटस्थापना व दुर्गा देवीच्या पूजेचे आवश्यक साहित्य---

                  नवरात्र घटस्थापना पूजा विधी-----

     दुर्गा देवीची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करावी. यानंतर मातीवर कलश ठेवावा. अक्षता, फूल आणि गंगाजल घेऊन वरुण देवतेचे आवाहन करावे. कलशात सर्वोषधी आणि पंचरत्न ठेवावे. कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य (जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी) आणि सप्तमृतिका मिसळावे.

     आंब्याची पाने कलशात ठेवावीत. कलशावर एका पात्रात धान्य भरून त्यावर एक दीप प्रज्ज्वलित करावा. यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र लपेटून नारळ ठेवावा.

     कलशाखाली असलेल्या मातीत जव पसरावे. यानंतर देवीचे ध्यान करावे. 'खड्गं चक्र गदेषु चाप परिघांछूलं भुशुण्डीं शिर:, शंखं सन्दधतीं करैस्त्रि नयनां सर्वांग भूषावृताम। नीलाश्मद्युतिमास्य पाद दशकां सेवे महाकालिकाम, यामस्तीत स्वपिते हरो कमलजो हन्तुं मधुं कैटभम।।', असा मंत्र म्हणावा.

               शारदीय नवरात्रोत्सव : नवरात्रीची आरती----

     यानंतर गणपती आणि घरातील देवतांची पूजा करावी. महादेव शिवशंकर आणि ब्रह्मदेवांचे स्मरण करावे. यानंतर भगवती देवीची पूजा करून दुर्गा सप्तशती पठण करावी. दुर्गा सप्तशती तीन भागात विभागले असून, पठण करताना एका चरित्राचे करावे.

--लेखक-देवेश  फडके
  -------------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स .कॉम)
               -----------------------------------------------

                                          रंग नवरात्रीचे
                                             कविता
                                        --------------


सभोवार  खुलला 
पवित्र  पिवळा  रंग
अवकाशासाठी  लाभे  त्रिभुवनी
प्रांजळ  त्या  सूर्यप्रकाशाचा  संग.


                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-चित्रकविता.कॉम)
               -----------------------------------------



-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.10.2021-गुरुवार.