म्हणी-"उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग"

Started by Atul Kaviraje, October 08, 2021, 11:49:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -"उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग"

                                          म्हणी
                                       क्रमांक -50
                             "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग"
                             ------------------------------


50. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
    ------------------------------

--प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारचा उतावळेपणा दाखविणे.
--लगबगीचे वर्तन करणे.
--लग्नासाठी अधीर झालेला मुलगा कोणत्याही परिस्थितीचा सारासार विचार न करता लग्नाला तयार असतो .ही म्हण रूपक अर्थाने एखादी व्यक्ती सर्व परिस्थिती समजून न घेता अधीरतेने निर्णय घेते तेव्हा अस म्हटले जाते.
--एखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करणे.
--उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
--अतिशय उतावळेपणामुळे मुर्खासारखे वागणे.
--अतिशय उतावीळपणाने  काम करणे.
--अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.
--लग्नाच्या वेळी बाशिंग डोक्याला बांधतात, पण घाई सुटलेल्या नवरदेवाने ते गुडघ्याला जसे बांधावे तसे. बेसुमार घाई.
--डोक्याला बाशिंग बांधण्याऐवजीं घाईनें गुडघ्यालाच बांधणें. एखाद्या कामाची अतिशय गर्दी झाली म्हणजे भलतीच कांहीं तरी गोष्ट करणें.

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                --------------------------------------------

--वाक्य वापर : कोणत्याही व्यवसायात दीर्घकालीन यश मिळवायचे असेल तर उतावळा नवरा बनून आणि गुडघ्याला बाशिंग बांधून उपयोग होत नाही.

--उदाहरण व लेख-----

    अजून उमेदवारी ठरलेली नाही, निवडणुकांच्या तारखा ठरलेल्या नाहीत... एका पक्षाने तर, महानगरपालिका निवडणूक लढवायचीच नाही असे ठरलेले असताना सुद्धा पक्षाचे चिन्ह, साहेबांचे दिशादर्शक फोटो, सोबत स्वतःचे व कुटुंबियांचे हसरे फोटो असलेले फ्लेक्स पत्रके टाकण्यास सुरुवात केली आहे. तर काही इच्छूकांचे पक्ष ठरत नाहीयेत... काहीजण पक्षप्रवेशासाठी राजस्थानी राजवड्याचे उंबरठे झिजवत आहेत. तर काहींच्या फक्त मनासारखा वार्ड मिळाला नाही म्हणून पक्ष प्रवेश रखडला आहे. काहीजण "गड्या आपुला पक्ष बरा" म्हणत पुन्हा आधीच्याच बंगल्यावर परतले आहेत. हे आहे सध्याचे नगरी राजकारण...

     सोशल मिडीयावर अचानकपणे वाढलेला फोटोंचा सुळसुळाट, काहीच ठरलेले नसताना हा जोरदार प्रचार बघता एकंदरीत "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग" ही म्हण भावी नगरसेवकांबाबतीत खरी होताना दिसत आहे.

     गणपती आणि नवरात्री या सणांच्या माध्यमातून इव्हेंट करत नवाट गडी एक पाउल पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अगदीच बोटावर मोजण्याईतके विद्यमान नगरसेवक अजूनही दिवाळीचा किराणा भरून, मतदारांचे गाऱ्हाणे ऐकून, नव्याने मतदारांना भूल देऊ अशा पारंपारिक गोष्टींवर विश्वास ठेऊन अजूनही कामाला लागलेले नाहीयेत.

      त्यातच संसर्गाने होत असलेले आजारही याच काळात आलेले आहेत. त्याचाच फायदा घेत सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली नेहमीचेच विविध शिबिरे घेऊन मतदारराजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतः राजा होण्याची ही पध्दत जुनी असली तरी अजूनही लागू पडत असल्यामुळे ती पद्धतही राबवली जात आहे.

--लेखक : विनोद सूर्यवंशी (अहमदनगर)
  ----------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-एम.डेली हंट.इन)
                  ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.10.2021-शुक्रवार.