"जागतिक टपाल दिन"-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, October 09, 2021, 01:24:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "जागतिक टपाल दिन"
                                             लेख क्रमांक-१ 
                                      -----------------------
मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक-09.10.2021- शनिवार आहे. आजचा दिवस "जागतिक टपाल दिन" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

           October 09---World Post Office Day

"To mark the anniversary of the establishment of Universal Postal Union in 1874 in Bern, Switzerland."

"युनिव्हर्सल पोस्टल युनियनची ९ ऑक्टोबर १८७४साली स्थापना झाली होती. १९६९पासून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. पोस्टाच्या कामाची माहिती व्हावी, जनजागृती होवून पोस्टाचे महत्व वाढीस लागावे हा दिन साजरा करण्यामागील हेतू आहे. अनेक देशात या निमित्ताने पोस्टल विक पाळला जातो."

    जागतिक टपाल दिन (World Post Day ) विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मला अभिमान आहे मी इंडीया पोस्टचा (India Post) कर्मचारी असे वाक्य लिहलेला पांढरा टि शर्ट परिधान करुन सर्व कर्मचारी कार्यालयात आले होते. टपाल दिनानिमित्त कार्यालयात मिठाई वाटप करण्यात आली. अनेक ग्राहकांनी पोस्ट कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या. मुख्य पोस्ट कार्यालयासह विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांनी परिसराची स्वच्छता करुन टपाल दिन साजरा केला. पोस्टात शुक्रवारी दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.

     युनिव्हर्सल पोस्टल युनियनची ९ ऑक्टोबर १८७४साली स्थापना झाली होती. १९६९पासून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. पोस्टाच्या कामाची माहिती व्हावी, जनजागृती होवून पोस्टाचे महत्व वाढीस लागावे हा दिन साजरा करण्यामागील हेतू आहे. अनेक देशात यानिमित्ताने पोस्टल विक पाळला जातो.

     भारतीय डाक विभाग आता फक्त पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील आधार संलग्न भुगतान सेवा (एईपीएस)मार्फत ग्राहक पोस्टाशी जोडले जात आहेत. कोरोना महामारीच्या काळातही ग्राहकांनी पोस्टाच्या विविध सेवांचा लाभ घेतला. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमध्ये पोस्टाच्या माध्यमातून अडीचशे कोटी रुपये इतर बँकेच्या आपल्या खात्यातून उलाढाल केली. यासेवेत कोल्हापूर पोस्ट कार्यालय देशात अव्वल ठरले होते. यामुळे पोस्ट कर्मचाऱ्यांची जबादारी वाढली असून येत्या काळातही पोस्ट सर्वोत्तम सेवा देण्यास सज्ज असेल अशी ग्वाही कर्मचाऱ्यांनी दिली.

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टुडे.कॉ.इन)
             --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.10.2021-शनिवार.