"जागतिक टपाल दिन"-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 09, 2021, 01:26:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "जागतिक टपाल दिन"
                                            लेख क्रमांक-2
                                       ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक-09.10.2021- शनिवार आहे. आजचा दिवस "जागतिक टपाल दिन" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

    इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे. जाणून घ्या काय आहे त्याचा इतिहास आणि हा दिवस साजरा करण्याचं महत्त्त्व.

      जागतिक टपाल दिन किंवा 'वर्ल्ड  पोस्ट डे' हा जगभरातून साजरा केला जात आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो. इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे. एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे पोस्ट सेवा. फक्त देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो. जाणून घ्या काय आहे त्याचा इतिहास आणि हा दिवस साजरा करण्याचं महत्त्त्व.

     जगात दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 9 ऑक्टोबरला टपाल दिवस साजरा करण्याचा हेतू एवढाच कि, टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना जागरुक करणे होय.

                     जागतिक टपाल दिनाचा इतिहास---

     युनिवर्सल पोस्टल युनियन (युपीयु) ची उभारणी करण्यासाठी 1874 मध्ये स्विर्झलंडची राजधानी 'बर्न' येथे 22 देशांनी मिळून करारावर सही केली होती. टोकियोत 1969 मध्ये आयोजित केल्या गेलेल्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. 1 जुलै 1876 ला भारत 'युनिवर्सल पोस्टल युनियन' चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला.

                तंत्रज्ञानासोबत टपाल सेवेत होतोय बदल !---

     बदलत्या काळासोबत जगातील सर्व टपाल सेवांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक बदल केले आहेत. नवीन तंत्रज्ञानासह टपाल सेवांनी स्वत: ला अधिक जलद केले आहे. डाक, पार्सल, पत्र हे एक्सप्रेसने जाण्याची सेवा सुरु झाली. जवळपास 20 वर्षांपूर्वी या बदलावांना सुरुवात झाली आणि सर्वच स्थरावर तांत्रिक बदल करण्यात आले. आता ऑनलाईन पोस्टल देवाण- घेवाणीवरही लोकांचा विश्वास वाढला आहे. 'युपीयु ने केलेल्या एका सर्वेमध्ये अशी माहिती समोर आली की जगभरातून आजच्या घडीला 55 पेक्षा जास्त प्रकारच्या ई- पोस्टल सेवा उपलब्ध आहेत.


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ सकाळ.कॉम)
                   -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.10.2021-शनिवार.